शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

घरांची पडझड, पोलिसांची धडपड !

By admin | Updated: April 27, 2016 00:54 IST

पोलिस वसाहतींची दुरवस्था : कुटुंबीयांचा जीव टांगणीला; के. पी. बक्षी करणार शुक्रवारी पाहणी

एकनाथ पाटील -- कोल्हापूर -पोलिसांना नवीन घरे देण्याची गृहखात्याची घोषणा फक्त कागदावर राहिली आहे. पोलिस प्रशासनाने पाठविलेल्या नवीन घरांच्या प्रस्तावावर कोणतीच हालचाल झालेली नाही. राज्याचे गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी हे शुक्रवारी (दि. २९) पोलिस वसाहतींची पाहणी करणार आहेत. नवीन घरांचे स्वप्न उराशी बाळगून संसाराची मोट बांधलेल्या पोलिसांसह कुटुंबीयांना आजही पडझड झालेल्या छोट्याखानी घरांमध्ये मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मुख्य सचिव बक्षी यांनी आमच्या कुटुंबीयांच्या वेदना जाणून घेत घरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस वसाहतींना सध्या अवकळा प्राप्त झाली आहे. या वसाहती विविध समस्यांच्या भोवऱ्यात अडकल्याने घरे सोडून काही पोलिस भाड्याच्या घरात निघून गेले आहेत. पोलिसांच्या घरांची बिकट अवस्था पाहून गृहखात्याने पोलिसांना नवीन घरे देण्याची घोषणा यापूर्वी केली होती. त्यासाठी राज्यभरातून प्रस्तावही मागवून घेतले. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रशासनाने नवीन घरांचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या स्वाक्षरीने पोलिस महासंचालकांकडे पाठविला; तेथून तो गृहखात्याकडे पाठविण्यात आला आहे; परंतु या प्रस्तावावर अद्यापही कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही. इंग्रजांच्या काळात सुमारे पाच एकरात बुधवार पेठ व लक्ष्मीपुरी परिसरात पोलिसांना राहण्यासाठी १७० घरे (क्वॉर्टर्स) बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर पोलिस मुख्यालयासमोरही पोलिसांसाठी घरे उभारली आहेत.पोलिस प्रशासनात अधिकारी १६५, कॉन्स्टेबल २५८१ असे एकूण २७४६ आहेत. अधिकाऱ्यांसाठी ४७, तर कॉन्स्टेबलसाठी १४८० अशी एकूण १५८० घरे सध्या आहेत. ही सर्व कौलारू आणि दहा बाय दहाच्या दोन खोल्या असून, यामध्ये स्वयंपाकखोली आणि बैठ्या खोलीसह आंघोळीसाठी छोटेसे बाथरूम अशी या घरांची रचना आहे. एकेकाळी ही वसाहत बहरून गेली होती. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या वास्तव्यामुळे या वसाहतीला कॉलनीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जस-जसे पोलिसांच्या कुटुंबीयांच्या संख्येत वाढ होत गेली, तशी घरे अपुरी पडू लागली. त्यातच वसाहतीमधील समस्यांकडे पोलिस प्रशासनाने लक्ष न दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे स्वास्थ्य हरपले आहे. वाढती गुन्हेगारी, आंदोलने यामुळे पोलिसांचा कामाचा ताण वाढत आहे. घटकाभर विश्रांती घ्यायची म्हटली तरी देखील हक्काच्या घरातील अडचणींमुळे ते त्यांच्या पदरी पडत नाही. गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव बक्षी हे पोलिस वसाहतींची पाहणी करणार आहेत येथील समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारीही पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. कित्येक वर्षांपासून छोट्याखानी घरांमध्ये मरणयातना भोगणाऱ्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न बक्षी यांनी मार्गी लावावा, अशी अपेक्षा पोलिसांतून व्यक्त होत आहे.