शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

तिर्थक्षेत्र विकासाचा नारळ फोडा, अन्यथा घरासमोर उपोषण, रवि इंगवले यांचा पालकमंत्र्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 16:41 IST

महसूलाच्या जोरावर पैशांची उधळपट्टी करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निव्वळ घोषणांचा पाऊस पाडला. त्यांनी आता श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याचा नारळ फोडावा अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण केले जाईल. तर त्यांच्यासह देवस्थानच्या अध्यक्षांनाही मंदीराचा दरवाजा बंद करु असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला.

ठळक मुद्दे तिर्थक्षेत्र विकासाचा नारळ फोडा, अन्यथा घरासमोर उपोषण, रवि इंगवले यांचा पालकमंत्र्यांना इशारा शिवसेनेतर्फे महाद्वार चौकात रास्ता रोको; देवस्थान अध्यक्षांना मंदीराचे दरवाजे बंद करु

कोल्हापूर : महसूलाच्या जोरावर पैशांची उधळपट्टी करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निव्वळ घोषणांचा पाऊस पाडला. त्यांनी आता श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याचा नारळ फोडावा अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण केले जाईल. तर त्यांच्यासह देवस्थानच्या अध्यक्षांनाही मंदीराचा दरवाजा बंद करु असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला.करवीर निवासिनी श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ८० कोटीं रुपये मंजूर झाले पण ते विकासासाठी अद्याप वर्ग का नाही झाले? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना शहर शाखेच्यावतीने शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी श्री अंबाबाई मदीर, महाद्वार चौकात तीव्र निदर्शने केली, त्यावेळी इंगवले बोलत होते. यावेळी रास्ता रोको आंदोलनामुळे महाद्वार रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे नाव न घेता इंगवले यांनी त्यांच्यावर सडकून टिका केली.इंगवले म्हणाले, करवीर नगरीला काँग्रेसपासून भाजप सरकारपर्यत नेहमीच उपासात्मक ठेवले आहे. पंढरपूरचा विकास होतो, नृसिंहवाडीचा होतो, मग कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदीराचा विकास न करण्याचा पालकमंत्र्यांचा हेतू काय? असा प्रश्न उपस्थित करत इंगवले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री पाटील हे श्री अंबाबाईसमोर माथा टेकवून तिर्थक्षेत्र आराखड्याच्या नुसतीच घोषणा करतात. अंधारात काजव्यांचा महोत्सव करणाऱ्यांंचा विकास आता उजेडातही दिसेनासा झाला आहे. तीर्थक्षेत्राची बोळवण करणाºया मंत्री पाटील यांनी भक्तांची मानसिक फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला.या आंदोलनात बाबासाहेब महाडिक, राजाभाऊ घोरपडे, आबाजी जगदाळे, तात्या साळोखे, उदय माने, उमेश पाटील चंद्रकांत नवरुखे, उमेश पाटील, सचिन कारंडे, युवराज खाडे, उपप्रमुख जयवंत हारुगले, कपिल केसरकर, विक्रम पाटील, विक्रम शिंदे, राकेश माने, राजू कदम, सुरेश फडतारे, संदीप भालकर, सुमीत चौगुले, रवि चौगुले, बंडा लोंढे, तानाजी जाधव आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर