प्रकाश पाटील -कोपार्डे -सध्या साखरेचे दर गडगडल्याने संपूर्ण ‘शुगरलॉबी’ अस्वस्थ असताना जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांना सहवीज प्रकल्पाचा काडीचा आधार मिळाला आहे. हंगाम २०१४-१५ मध्ये या कारखान्यांनी मार्च २०१५ अखेर ५६ कोटी १६ लाख ९३ हजार युनिट वीज महावितरणला पुरवली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे सहवीज प्रकल्प आहेत. या कारखान्यांनी २०१४-१५ च्या हंगामात मार्च २०१५ अखेर आपल्या सहवीज प्रकल्पातून चांगल्याप्रकारे वीजनिर्मिती केली आहे. यामुळे सध्याच्या आर्थिक अरिष्टात साखर कारखान्यांना याचा काडीचा आधार मिळाला आहे. सहवीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक युनिटला ६ रुपये १९ पैसे प्रमाणे चांगला दर मिळत आहे. वारणा साखर कारखान्याने सर्वाधिक ९ कोटी १४ लाख १२ हजार ५०० युनिट विजेची मार्च २०१५ अखेर निर्मिती केली आहे. ‘दत्त शिरोळ’ने ७ कोटी ५० लाख युनिट वीज निर्माण करत दुसऱ्या क्रमांक मिळविला आहे. या सर्व साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्पातून महावितरणला पुरवठा केलेल्या ुविजेपोटी अंदाजे ३४६ कोटीचे उत्पन्न मिळाले आहे.सध्या ज्या साखर कारखान्यांचे सहवीज प्रकल्प उभे आहेत ते ऊसखरेदी करातून उभारण्यात आले आहेत. अशांना ऊसखरेदी करातून सूृट मिळणार आहे. सर्वसाधारण ५ लाख गाळप करणाऱ्या कारखान्याला पाच कोटी, तर १० लाखापर्यंत गाळप करणाऱ्यांना १० कोटीपर्यंत किमान ऊसखरेदी कर माफी मिळणार आहे.सध्या साखरेचे दर २१०० ते २२५० वर येऊन ठेपल्याने वित्तपुरवठा करणाऱ्या राज्य सहकारी बॅँक व जिल्हा बॅँकांनी अर्थपुरवठ्यासाठी हात आखडता घेतला आहे. बगॅसवर ही वीज करता येत असल्याने सहवीज निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना सहज व स्वस्थ इंधन प्राप्त होत असते. या वीजनिर्मितीमुळे कोळशावरील वीजनिर्मितीवरील ताण कमी होणार असून लोडशेडिंगला पर्याय उपलब्ध झाला आहे.३१ मार्चअखेरची वीजनिर्मितीची आकडेवारीकारखान्याचे नावक्षमता एकूण वीज निर्यात (मेगावॅट)(युनिटमध्ये)वारणा कारखाना४४९ कोटी १४ लाख १२ हजार ५००कुंभी कासारी कुडित्रे१७.५३ कोटी २ लाख ३१ हजारदत्त दालमिया आसुर्ले पोर्ल२३५ कोटी २५ लाख दुधगंगा वेदगंगा बिद्री२०४ कोटी ३४ लाख ४२ हजार ८२५छत्रपती शाहू कागल२१.५३ कोटी ४३ लाखहमिदवाडा, कागल१२२ कोटी २६ लाख ४९ हजार ८५०जवाहर, हुपरी२७३ कोटी ८१ लाख २ हजार १५दत्त शिरोळ३६७ कोटी ५०गुरुदत्त१५३ कोटी ३१ लाख ६ हजारसेनापती संताजी२३४ कोटी ६ लाख ३५ हजारशरद नरंदे०६१८ लाख ७२ हजार ६००डी. वाय. पाटील, पळसंबे२०६० लाखहेमरस२०.५४ कोटी ५० लाखपंचगंगा, इचलकरंजी३०४ कोटी ७४ लाख ४४ हजार
जिल्ह्यातील कारखानदारीला ‘सहवीज’ने तारले
By admin | Updated: April 7, 2015 01:24 IST