शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

गांधीनगर बाजारपेठेत कडकडीत बंद

By admin | Updated: December 18, 2014 00:02 IST

अशोक चंदवाणीवर कारवाई करा : व्यापारी वर्गाची मागणी; करोडोंची उलाढाल ठप्प

गांधीनगर : अशोक चंदवाणी यांच्याकडून खंडणीसाठी होणारा अन्याय व दहशतीच्या निषेधार्थ संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेत आज, बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदचे आवाहन होलसेल व्यापारी असोसिएशन व रिटेल व्यापारी असोसिएशनसह व्यापारी वर्गाच्यावतीने करण्यात आले होते. एका व्यक्तीविरुद्ध गांधीनगर बाजारपेठ बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.सकाळी अकरा वाजता होलसेल व रिटेल व्यापारी सिंधी सेंट्रल पंचायतीजवळ एकत्र आले. त्यांनी अशोक चंदवाणी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. खासगी मालमत्तेत कोणतेही हितसंबंध नसताना कायदेशीर डावपेचात अडकवून खंडणी मागणाऱ्या अशोक चंदवाणीस जिल्ह्यातून हद्दपार करा, अशा घोषणा देण्यात येत होत्या. होलसेल व रिटेल व्यापारी असो.चे पदाधिकारी व व्यापारी प्रतिनिधींच्या आवाहनानुसार गांधीनगर बाजारपेठ बंद राहिली.तावडे हॉटेल परिसर, गांधीनगर मेनरोडवरील सर्व दुकाने बंद राहिली. स्वस्तिक मार्केट, गजानन मार्केट, झुलेलाल मार्केट, फुटवअर मार्केट, सिंधू मार्केट, गुरुनानक मार्केट, आदी बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद राहिली. बंद अचानक जाहीर झाल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली.गांधीनगर पोलीस ठाण्यातही अशोक चंदवाणीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी निवेदन दिले. तेथेही व्यापाऱ्यांनी अशोक चंदवाणीवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, गांधीनगर परिसरातील खंडणीबहाद्दरांचा व्यापाऱ्यांना धोका निर्माण झाला असून, त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, त्यांना जिल्ह्णातून हद्दपार करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन गांधीनगर येथील शंभरहून अधिक व्यापाऱ्यांनी आज, बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने गेले. दरम्यान, सिंधी सेंट्रल पंचायतजवळ जमलेल्या प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये सुरेश ऊर्फ पप्पू आहुजा, मुरली रहंदीमल खूबचंदाणी, संदीप आहुजा, संजय चुहा, रमेश वाधवाणी, मनोज बचवानी, गुलशन आहुजा, दिनेश दुल्हानी, विनोद दुल्हानी, सुंदर कलानी, रावसाहेब जगताप, अमर शेटके, आदी सहभागी झाले होते.करोडोंची उलाढाल ठप्पमुंबई बाजारपेठेखालोखाल गांधीनगर बाजारपेठ उलाढालीमध्ये प्रसिद्ध आहे. बंदमुळे सर्व होलसेल व रिटेल दुकाने बंद राहिली. सर्व व्यवहार बंद राहिल्याने करोडोंची उलाढाल ठप्प झाली. इलेक्ट्रॉनिक्स, कटलरी, फुटवेअर, कापड, रेडिमेड वस्त्र, ट्रान्स्पोर्ट कंपन्या बंद राहिल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले.