शहरं
Join us  
Trending Stories
1
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
2
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
3
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
4
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
5
नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  
6
टाटा-रिलायन्सला सरकारी कंपनी ठरली सरस! आठवड्यात कमावला ५९,२३३ कोटी रुपयांचा नफा
7
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
8
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
9
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
10
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
11
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
12
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
13
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
14
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
15
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
16
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
17
पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर
18
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
19
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
20
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा

कापड भरलेला ट्रक जळाला

By admin | Updated: February 5, 2016 00:51 IST

इचलकरंजीतील घटना : ६० लाख रुपयांचे नुकसान

इचलकरंजी : येथील सीईटीपी रिंगरोडवर कापडाच्या गाठीने भरलेल्या ट्रकला मध्यरात्री अचानक आग लागली. यामध्ये सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत २१४ गाठी जळाल्या असून, आग नेमकी कशामुळे लागली, हे मात्र समजू शकले नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील हणमंतसिंग उदयसिंग राजपुरोहित यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. शिवशक्ती लॉजिस्टिक या नावाने त्यांचे जुना चंदूर रोडवर कार्यालय आहे. या ठिकाणी बुधवारी सायंकाळी एमएच १० झेड २३२२ या अमोल टाकळे यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये ग्रे कापडाच्या २१४ गाठी भरण्यात आल्या होत्या. हा ट्रक गुरुवारी पहाटे अहमदाबादकडे रवाना होणार होता. त्यासाठी रात्री त्यांच्या सांगली रोडवरील घराजवळ बीग बझारनजीक हा ट्रक लावण्यात आला होता. मात्र, पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास या ट्रकला अचानकपणे आग लागली. कापडाच्या गाठीमुळे आग पसरून धुराचे लोट पसरू लागले. ही घटना काहींच्या लक्षात येताच त्यांनी पुरोहित यांना या घटनेची कल्पना दिली. त्यांनी अग्निशामक दलाला माहिती कळविली. अग्निशामक दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. मात्र, या दुर्घटनेत २१४ कापडांच्या गाठी जळाल्याने सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (वार्ताहर)