कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना साजणी ता. हातकणंगले येथील नागरिकांनी जमावबंदी आदेशाचा भंग करत चौकाचौकात नागरिक गटाने गर्दी करत होते.
ग्रामपंचायत व दक्षता समिती वारंवार नागरिकांना आवाहन करूनही नागरिक यास प्रतिसाद देत नव्हते
दरम्यान, याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ग्राम पंचायत सदस्यांनी १८ रोजी गावात मास्क वापरण्याचे आवाहन केले. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तिंना दंड तसेच चौकात जमा होणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्याचा इशारा दिला, तसेच स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले.