शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

लिपिकांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन

By admin | Updated: July 15, 2016 23:58 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : ग्रेड पेसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ५५५ कर्मचारी सहभागी

कोल्हापूर : लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मध्ये सुधारणा केलेली नाही. यासह बदल्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. पदवीधर लिपिकांना अध्यापकाप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणी द्यावी. लोकसेवा आयोगाच्या विविध पदांसाठी परीक्षांना बसण्यासाठी ४५ वर्षे वयापर्यंत सवलत द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह १२ पंचायत समिती व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुमारे ५५५ कर्मचारी सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊन त्यांना रिकाम्या हातांनी परत जावे लागले.जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासन वेळकाढू धोरण अवलंबत आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून राज्यभरातील जिल्हा परिषद लिपिकांचा बेमुदत ‘लेखणी बंद’ आंदोलनाचा इशारा, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने दिला होता. त्यानुसार हे आंदोलन सुरू करण्यात आले.गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत : लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मध्ये सुधारणा केलेली नाही. यासह बदल्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. पदवीधर लिपिकांना अध्यापकाप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणी द्यावी. लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या परीक्षांना बसण्यासाठी ४५ वर्षे इतक्या वयापर्यंत सवलत द्यावी. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी. कक्ष अधिकारी यांना ‘वर्ग दोन’चा दर्जा द्यावा. ‘एनएचआरएम’ व ‘आरकेएस’च्या कामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र लिपिक मंजूर करावा, कक्ष अधिकाऱ्यांना वर्ग २ चा दर्जा द्यावा, यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५५५ कर्मचारी सहभागी झाले आहेत. कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊन त्यांना रिकाम्या हातांनी परत जावे लागले. बावड्यात पन्नासहून अधिक कर्मचारी सहभागीकसबा बावडा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, पंचायत समितीकडील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलनास सुरुवात केली. पंचायत समिती करवीरकडील कक्ष अधिकारी, अधीक्षक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, असे पन्नासहून अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. पंचायतीचे कामकाज शुक्रवारी दिवसभर ठप्प झाले. संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष एकनाथ रसाळ, सचिव दयानंद पाटील, खजानिस निवास पोवार तसेच एस. व्ही. साळोखे, सचिन कांबळे, बी. एस. डवरी, बी. एस. चव्हाण, आदींसह अनेक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलन यशस्वी होणार : मगरगारगोटी : जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यामुळे शुक्रवारपासून बेमुदत ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू केले. जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याने आंदोलन यशस्वी होणार आहे, असे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर यांनी केले. गारगोटीतही या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तालुका सचिव बाजीराव कांबळे, प्रशांत मोहंडुळे, सदाशिव मंडी, अमित माळगे, शरद गोसावडेकर, महेश निकम, प्रशांत परीट, सुधीर चोपडे, श्रीमती बी. एस. भांदिगरे, एस. एम. सुरवसे यांच्यासह सर्व लिपिक उपस्थित होते.३0 कर्मचारी सहभागीहातकणंगले : येथील पंचायत समितीकडील लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये ३0 कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनामध्ये राजदीप मेतके, कृष्णात माने, अनिल पाटील, यशवंत भानुदास, आर. आर. पाटील, संतोष कोळी, साजणे, युवराज कांबळे, सुधीर पाटील, आदी सहभागी झाले होते. सर्व कमचारी सहभागी गडहिंग्लज : राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्या येथील शाखेतर्फे लिपिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गडहिंग्लज पंचायत समितीकडील सर्व विभागांतील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनात शाखाध्यक्ष रवींद्र जरळी, उपाध्यक्ष कपिल पाटील, महिला प्रतिनिधी कांचन भोईटे, सतीश खमलेहट्टी, दयानंद पाटील, आदींसह विविध विभागांतील लिपिक सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)चंदगडमध्ये वृक्षरोपणाने आंदोलन सुरूमहाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या ‘लेखणी बंद’ आंदोलनाची सुरुवात शुक्रवारपासून झाली आहे. पंचायत समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण करून या आंदोलनाला चंदगड येथील कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. पंचायत समिती परिसरात लिपिक संघटनेतर्फे सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संजय चंदगडकर यांनी यावेळी संघटनेच्या मागण्यांबाबत मार्गदर्शन केले. आंदोलनात प्रसाद पाटील, विलास हरेर, उदय गुरव, लक्ष्मी पुजारी, प्रिया पुजारी, तानाजी सावंत, मोसिन पटेल, भैरू कुंभार, शशिकांत सुतार, सॅमसंग धुपदाळे, रोहिणी गारे, राजश्री काकतकर, छब्बी पवार, सुनंदा घोलराखे, सुशीला तळपे, प्रकाश वार्इंगडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.