शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

लोकसहभागातून स्वच्छता, सात डंपर कचरा उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:40 IST

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने गुरुवारी जुना वाशी नाका येथील शाहू स्मृती उद्यान व पद्माराजे उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात ...

ठळक मुद्देलोकसहभागातून स्वच्छता, सात डंपर कचरा उचललामहापौर सरिता मोरे,आयुक्त कलशेट्टी यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने गुरुवारी जुना वाशी नाका येथील शाहू स्मृती उद्यान व पद्माराजे उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उद्यानामधील झाडांना तसेच परिसराला रंगरंगोटी करून उद्यानामध्ये कचरा न करणे तसेच स्वच्छतेविषयीचे फलक लावण्यात आले. मोहिमेचा प्रारंभ महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.निसर्ग व आरोग्य यांचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी आपल्या परिसरातील उद्याने तसेच लगतचा परिसर स्वच्छ ठेवून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त कलशेट्टी यांनी केले.

महापौर मोरे यांनी प्रत्यक्ष स्वच्छतेला सुरुवात करून उपस्थित नागरिकांच्या समस्या व सूचना समजावून घेऊन भविष्यात त्या पूर्ण करण्यासाठी महापालिका निश्चित प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. स्थायी सभापती शारगंधर देशमुख यांनीही या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून दोन्ही उद्याने आदर्श उद्यान बनविण्याचा मानस व्यक्त केला.मोहिमेअंतर्गत सकाळी दोन तास पद्माराजे उद्यान व शाहू स्मृती उद्यान येथे नागरिकांनी श्रमदान केले. मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, लेखा विभाग, लेखापरीक्षण विभाग, ए वॉर्ड घरफाळा, अग्निशमन, शिक्षण मंडळ व उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच नागरिकांनीही मोठा सहभाग घेतला होता.यामध्ये उपमहापौर महेश सावंत, विक्रम जरग, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, नोडल आॅफिसर संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, विधि अधिकारी संदीप तायडे, अतिक्रमण निर्मूलन विभागचे प्रमुख पंडित पोवार, नारायण भोसले, सुनील बिद्रे, सचिन जाधव, आर. के. पाटील, संजय नागरगोजे, रवी पोवार, बाबा साळोखे, सचिन पांडव, दिलीप देसाई, ‘व्हाईट आर्मी’चे अशोक रोकडे, उदय गायकवाड, डॉ. संजय वाळके, योगेश साळोखे, रंगराव चौगुले, पूनम माने, सागर नागवेकर, चेतन शिंदे व शिवाजी पेठ परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महापालिकेच्या दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने सात डंपर कचरा संकलित करण्यात आला.

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर