गडहिंग्लज : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गडहिंग्लज पालिकेतर्फे शहराच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह ११०० विद्यार्थी व १०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. गुरुवारअखेर सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात ही मोहीम चालणार आहे.वडरगे रोडवरील बेलबागेत सहायक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी डीवाय एस.पी. सागर पाटील, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी चंचल पाटील, मुख्याधिकारी तानाजी नरळे, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले उपस्थित होते.नगर अभियंता रमेश पाटील, जलअभियंता जमीर मुश्रीफ, आरोग्य निरीक्षक रमेश मुन्ने आदींसह नगरसेवक, खातेप्रमुख व नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांनी आभार मानले.शहरातील सर्व हॉटेल्स्, शीतपेये गृहे व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांची स्वच्छता व त्याठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले पिण्याचे पाणीदेखील तपासण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांच्या साफसफाईबरोबरच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गाजरगवत काढण्यात येत आहे. डासांच्या प्रतिबंधासाठी डीडीटी पावडर व धूरफवारणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)मास्क -हँडग्लोव्हज व मिनरल वॉटर पुरवठास्वच्छता मोहिमेसाठी अर्चना तेजम यांनी ५०० मास्क व ५०० हँडग्लोव्हज, तर गडहिंग्लज तालुका केमिस्ट असोसिएशनतर्फे ६०० मास्क व ६०० हँडग्लोव्हज पुरविण्यात आले. अण्णासाहेब गळतगे यांनी मिनरल वॉटरचा पुरवठा केला आहे.अल्पोपहार व भोजनाची व्यवस्थामोहिमेत सहभागी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी नगरसेवक उदय पाटील, नितीन देसाई, प्रकाश मोरे, पापा बेल्लद, महेश कोरी व शाहू बझारचे खानाई यांनी मदत केली आहे.
गडहिंग्लजमध्ये स्वच्छता अभियानास प्रारंभ
By admin | Updated: November 11, 2014 23:25 IST