शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महास्वच्छता मोहीम : मुसळधार पावसातही स्वच्छता मोहिमेचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 11:36 IST

मुसळधार पाऊस पडत असतानाही रविवारी महास्वच्छता मोहिमेस खंड पडला नाही, उलट सहभागी झालेल्या नागरिक व कर्मचाऱ्यांनी तितक्याच उत्साहाने चिखलात मोहिमेला हातभार लावला. सकाळी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. लोकसहभागातून ही मोहीम राबविली जात आहे.

ठळक मुद्देमहास्वच्छता मोहीम : मुसळधार पावसातही स्वच्छता मोहिमेचा ध्यासजयंती नाल्याची स्वच्छता व वृक्षारोपण; ४ डंपर कचरा गोळा

कोल्हापूर : मुसळधार पाऊस पडत असतानाही रविवारी महास्वच्छता मोहिमेस खंड पडला नाही, उलट सहभागी झालेल्या नागरिक व कर्मचाऱ्यांनी तितक्याच उत्साहाने चिखलात मोहिमेला हातभार लावला. सकाळी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. लोकसहभागातून ही मोहीम राबविली जात आहे.रविवारी सकाळी संप आणि पंप हाऊस येथे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते महास्वच्छता मोहिमेस व वृक्षारोपणास प्रारंभ करण्यात आला. उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून या मोहिमेत काम पाहिले. आयुक्तांनी न्यू कॉलेज सीटीओ एन. सी. सी. ५, महाराष्ट्र बटालीयनचे विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि पाय रुतणाऱ्या चिखलात ही मोहीम राबविली.उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा. आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, नारायण भोसले, आर. के. पाटील, परवाना अधीक्षक राम काटकर, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत पाटील, दिलीप देसाई, दिलीप पोवार, पारस ओसवाल, उदय गायकवाड, अनिल देसाई, अजय कोराणे व महापालिकेच्या सर्व विभागाकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील ३00 कर्मचारी, अधिकारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.मोहिमेत सहभागन्यू कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग, क्रिडाईचे सदस्य, आर्किटेक असोसिएशनचे सदस्य, तनिष्का महिला ग्रुप, स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते, राजोपाध्येनगर येथील अंध युवक मंच (हणबरवाडी)चे विद्यार्थी, विद्यार्थिनी, आदींचा सहभाग लाभला.सहा महिन्यांत जयंती नाल्याची बनणार नदीयेत्या सहा महिन्यांत जयंती नाल्याचे प्रदूषित पाणी शुद्ध कसे राहील, यातून या नाल्यास नदीचे पूर्ववत स्वरूप आणण्याचा प्रयत्न आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर गेले नऊ रविवार अथकपणे महापालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, समाजसेवी संस्था, नागरिकांच्या माध्यमातून जयंती नाल्याची टप्प्या-टप्प्याने स्वच्छता मोहीम सुरू आहे. जयंती नाल्याचे रूपांतर जयंती नदीमध्ये होत आहे.वृक्षारोपण अन् अंध विद्यार्थ्यांचा सहभागन्यू कॉलेज सीटीओ एन. सी. सी. ५, महाराष्ट्र बटालीयनचे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी स्वच्छता करून जयंती नदीच्या दोन्ही बाजूस बांबूच्या झाडांची रोपे लावली. रिलायन्स मॉलच्या पिछाडीस अंध युवक मंचच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्वच्छतेत सहभाग नोंदविला.आठ ठिकाणी स्वच्छता मोहीमहॉकी स्टेडियम ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ते लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागील बाजूस ते रिलायन्स मॉल पिछाडीस, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, संप आणि पंप हाऊस ते सिद्धार्थनगर, सिद्धिविनायक गणपती मंदिर पुलाची खालची बाजू, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, टायटन शोरूमलगत दफनभूमी, या जयंती नाल्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्वांना हँडग्लोज पुरविण्यात आले.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर