शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

जयंती नाल्याला ‘आक्सिजन’चा बूस्टर, महापालिकेची लोकसहभागातून सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:16 IST

जयंती नाल्याला पुन्हा नदीचे पूर्ववत रूप प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न महापालिकेने लोकसहभागातून केला. महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे २५०० जणांनी श्रमदान करण्यासाठी ‘स्वच्छ-सुंदर-निरोगी कोल्हापूर’ या मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला.

ठळक मुद्देकचरा, प्लास्टिक, खुरट्या वनस्पती हटविल्या; इतिहासात प्रथमच मोहीमनाल्याने घेतला मोकळा श्वास

कोल्हापूर : जयंती नाल्याला पुन्हा नदीचे पूर्ववत रूप प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न महापालिकेने लोकसहभागातून केला. महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे २५०० जणांनी श्रमदान करण्यासाठी ‘स्वच्छ-सुंदर-निरोगी कोल्हापूर’ या मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला.

रामानंदनगरपासून खानविलकर पेट्रोल पंपानजीक पंप हाऊस ते सिद्धार्थनगरपर्यंतच्या नाल्यातील व काठांवरील कचरा, प्लास्टिक, खुरट्या वनस्पती काढून नाल्याचे पाणी प्रवाहित केले. त्यामुळे नाल्याने आज मोकळा श्वास घेतला. जयंती नदीच्या इतिहासात अशा पद्धतीने व्यापक मोहीम प्रथमच राबविली. तिला प्रतिसादही उत्स्फूर्तपणे मिळाला.एकेकाळी धार्मिक अधिष्ठान लाभलेली जयंती नदी आणि सद्य:स्थितीत फक्त लोकप्रतिनिधींच्या उदासीनता, दुर्लक्ष, अतिक्रमणामुळे नदीचे स्वरूप मोठ्या नाल्यात झाले. पावसाळ्यापूर्वी यंदा महानगरपालिकेमार्फत लोकसहभागातून नालेसफाई म्हणजेच नाल्याला नदीचे पूर्ववत स्वरूप प्राप्त करून देण्याची संकल्पना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हाती घेतली.रामानंदनगर, हॉकी स्टेडिअम, सावित्रीबाई फुले रुग्णालय, लक्ष्मीपुरी, आयर्विन ब्रिज ते खानविलकर पेट्रोलपंपानजीक पंप हाऊसपर्यंत या जयंती नाल्याच्या दोन्ही काठांवरील कचरा, प्लास्टिक, पाण्यातील गाळ काढून हे पाणी प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न होता. त्याप्रमाणे रविवारी सकाळी यंत्रणा कामाला लागली. महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत हॉकी स्टेडियमनजीक सकाळी मोहिमेचा प्रारंभ झाला. दुपारपर्यंत ही मोहीम सुरूच होती. यातून हा नाला सफाई होऊन त्याने मोकळा श्वास घेतला.

नियंत्रित पाच पथकेहॉकी स्टेडियम ते सावित्रीबाई फुले रुग्णालय, रुग्णालय ते लक्ष्मीपुरी, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, पंप हाऊस ते सिद्धार्थनगर या पद्धतीने पाच विभाग पाच नियंत्रण पथके तयार करून ही मोहीम लोकसहभागातून राबविली.

विविध संघटनांचा सहभागमहापालिकेचे सर्व विभाग, शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभाग, केआयटी कॉलेज, व्हाईट आर्मी, पाचगावचा शिवबा मराठा मावळा गु्रप, फेरीवाला संघटना, निसर्गमित्र संघटना, वृक्षप्रेमी ग्रुप, आदी संघटनांचा यात सहभाग होता.

क्रिडाई कोल्हापूर, आर्किटेक्ट असोसिएशनचे योगदानक्रिडाई कोल्हापूरने दोन पोकलॅन मशीन देऊन या मोहिमेला हातभार लावला. त्यांचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव रवी माने, प्रदीप भारमल, विश्वजित जाधव, महेश पवार, संदीप मिरजकर, गणेश सावंत, विलास तहसीलदार यांच्यासह कार्यालयीन स्टाफ, कामावरील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. आर्किटेक्ट असोसिएशनेच अध्यक्ष अजय कोराणे, विजय चोपदार, उमेश कुंभार, अनिल घाटगे, प्रशांत काटे, वंदना पुष्कर, प्रमोद पोवार यांचेही योगदान लाभले.

सहभागाने लक्ष वेधलेआयुक्त डॉ. कलशेट्टी हे पत्नीसह, तर महापौर सरिता मोरे ह्या पती माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्यासह सहभागी झाल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, संयोगिताराजे, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, दिलीप देसाई, अशोक रोकडे यांनी श्रमदानात सहभाग घेतला.

यंत्रणा सरसावलीनाल्यातील दूषित पाण्यात उतरून कर्मचाऱ्यांनी गाळ काढला. काठावरील प्लास्टिकच्या पिशव्या-बाटल्या, काचेच्या बाटल्या, कचरा, खुरटी झाडे, आदी काढले. पाच जेसीबी, चार पोकलॅन, १० डंपरद्वारे एकूण ७० टन कचरा उठाव केला. कचरा उठाव करतानाच प्लास्टिक स्वतंत्र केले.

नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभागभाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव, अजित ठाणेकर, राजाराम गायकवाड, शेखर कुसाळे, ईश्वर परमार, ललिता बारामते, पूजा नाईकनवरे, उमा बनछोडे, माधुरी लाड, नियाज खान, दिलीप पोवार, संजय मोहिते या नगरसेवकांसह अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक आयुक्त संजय सरनाईक, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अभियंता एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, समीर व्याघ्रांबरे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आफळे, प्रशासनाधिकारी शंकर यादव, आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, अग्निशमन दलाचे प्रमुख रणजित चिले, आदी अधिकाऱ्यांसह आरोग्य, बागा, सार्वजनिक बांधकाम, घरफाळा, अग्निशमन, नगरसचिव, प्राथमिक शिक्षण मंडळ, पाणीपुरवठा, ड्रेनेज प्रकल्प, कार्यकारी अभियंता, वर्कशॉपमधील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी सहभाग नोंदविला.

कचरा व पाण्याविषयी शहरवासीयांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, याच उद्देशाने जयंती नाला स्वच्छता मोहीम ही लोकसहभागातून राबविली. यातून नागरिकांना घरगुती कचरा ओला व सुका स्वतंत्रपणे जमा करण्याची सवय लागावी हाच उद्देश आहे.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महापालिका

 

  1.  महापालिकेच्या मोहिमेत उत्साहाने लोकसहभाग
  2. पुन्हा कचरा नाल्यात टाकल्यास दंड
  3.  सफाईत ७० टन कचरा जमा
  4. जमा कचऱ्यांतून वीजनिर्मिती व उत्तम आरडीएम निर्मिती

 

 

 

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणkolhapurकोल्हापूर