शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

सत्ताधाऱ्यांचा ‘दावा’ अन विरोधकांची ‘हवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:19 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ची निवडणूक यावेळेला वेगळ्या वळणावर पोहोचली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून ...

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ची निवडणूक यावेळेला वेगळ्या वळणावर पोहोचली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून रविवारी मतदान झाल्यानंतर कोणाच्या ताब्यात ‘गोकुळ’च्या चाव्या जाणार या विषयी उत्सुकता शिगेला पाेहोचली आहे. दोन्ही आघाड्यांकडून राबविलेली प्रचार यंत्रणा, ठरावधारकांसाठी केलेली भांडवली गुंतवणूक, शेवटच्या टप्प्यातील लावलेल्या जोडण्या आणि नेत्यांनी पणास लावलेली प्रतिष्ठा पाहता, यावरून सभासदांचा कल मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मतदानानंतर सत्ताधारी आघाडीने मताधिक्याबाबत केलेले दावे आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावर तयार झालेली विरोधी आघाडीची हवा पाहता निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. करवीर, राधानगरी व भुदरगड तालुकेच ‘गोकुळ’च्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात सोपवायच्या हे ठरवणार असून तेथील राजकीय समीकरणे आणि झालेले मतदान पाहता, सत्तेचा लंबक विरोधी आघाडीकडून झुकला आहे, सत्ताधारी गटाचे संचालकही चांगल्या संख्येने संचालक मंडळात राहतील, असे चित्र आहे. दोन्ही आघाड्यांनी ते गटाशी प्रामाणिक राहिले तर असा निकाल लागू शकतो अन्यथा चित्र उलटे दिसू शकते.

‘गोकुळ’च्या सत्तेसाठी गेली दोन महिने रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये निकराची लढाई झाली. एका एका मतासाठी शेवटपर्यंत सर्व प्रकारच्या तडजोडी करण्यात आल्या. सर्व प्रकारचे तंत्र वापरल्याने निवडणुकीत इर्षा तयार झाली होती. रविवारी मतदान केंद्रावरही हीच इर्षा पहावयास मिळाली.

करवीरमध्ये सत्तारूढ आणि विरोधकांनी रांगेतून आणलेल्या ठरावांची संख्या पाहता येथे विरोधी आघाडी किमान ११० चे मताधिक्य घेईल, असे दिसते. चंदगड, गडहिंग्लज व कागल तालुक्यात सत्ताधारी आघाडीने शेवटपर्यंत आपला दबदबा कायम राखल्याने या तालुक्यात सरासरी ३० पासून ५० चे मताधिक्य सत्तारूढ गटाचे राहील. पन्हाळा, हातकणंगले, आजरा, शाहूवाडी तालुक्यातही सत्तारूढ गट मुसंडी मारण्याची शक्यता आहे. या चार तालुक्यात किमान २८० चे मताधिक्य घेण्याची शक्यता आहे. शिरोळ, गगनबावडा तालुक्यात विरोधी आघाडीने चांगलाच जम बसविल्याचे चित्र आहे. येथे किमान १०० चे मताधिक्य मिळू शकते. राधानगरी व भुदरगड तालुक्यात विरोधक मोठी आघाडी घेणार हे निश्चित आहे.

एकूणच, बारा तालुक्यात झालेले मतदान, त्यानंतर केलेले दावे, प्रतिदावे व प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील हवा या सगळ्याचा विचार करता सत्तेचा लंबक विरोधी आघाडीकडे झुकण्याची शक्यता अधिक आहे.

‘बाळूमामा’, ’विठलाई’कोणाला पावणार

दोन्ही आघाड्यांनी ठरावधारकांच्या शपथा घेऊनच केंद्रावर आणले होते. एका आघाडीने ‘बाळूमामा’, ‘विठलाई’ची शपथ घेतली तर दुसऱ्या आघाडीने ‘रेणुका’ची शपथ घेतली. त्यामुळे हे देव कोणाला पावणार याविषयी उत्सुकता लागली आहे.

क्रॉस व्होटींग ठरणार अनेकांची डोकेदुखी

पॅनेल टू पॅनेल मतासाठी दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली होती. एकही मत इकडे तिकडे होऊ नये, याची दक्षता घेतली होती. पॅनेल टू पॅनेल मते घेत, सोबतीला क्रॉस व्होटींगमध्ये बाजी मारणाराच विजयापर्यंत सरकणार आहे. तर क्रॉस व्होटींगच अनेकांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे.

दोन्ही आघाड्यांचे दावे प्रतिदावे -

तालुका एकूण मतदान सत्ताधारी विरोधी

करवीर ६३९ ३६४ ४३२

चंदगड ३४६ १९५ १९१

गडहिंग्लज २७२ १८० १६०

कागल ३८३ २२७ २००

भुदरगड ३७३ १६० २६०

राधानगरी ४५८ १५० ३५४

पन्हाळा ३५३ २२७ २०१

शिरोळ १३३ ९५ ८०

हातकणंगले ९५ ७५ ६६

आजरा २३३ २०० १००

गगनबावडा ७६ ३५ ६६

शाहूवाडी २८६ २०० १५०

एकूण ३६४७ २१०८ २२६०