शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

शहरात पारंपरिक पद्धतीने बकरी ईद उत्साहात

By admin | Updated: September 14, 2016 00:47 IST

देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक दुवा : मुस्लिम बोर्डिंगसह शहरातील विविध ठिकाणी नमाज पठण

कोल्हापूर : मुस्लिम बांधवाचा बकरी ईद (ईद-उल-अजहा) सण कोल्हापुरात सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने व धार्मिक वातावरणात मंगळवारी साजरा झाला. शहरात दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमधील पटांगणासह शहरातील विविध मशीदच्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आले. बकरी ईदनिमित्त मुस्लिमबांधव एकत्र जमले. यावेळी मुस्लिमबांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. नमाज पठणानंतर मानव कल्याण व विश्वशांती तसेच देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक दुवा (प्रार्थना) करण्यात आली. शहरात मंगळवारी सकाळी इब्राहिम खाटिक चौकातील कसाब मशीद, महाराणा प्रताप चौकातील अहिले हदिस मशीद, सदर बझार मशीद, टाऊन हॉल येथील राजेबागस्वार मशीद , बाराईमाम मशीद, उत्तरेश्वर पेठेतील जुम्मा मशीद, बिडी कॉलनी मशीद, गवंडी मोहल्ला मशीद, केसापूर मशीद (ब्रह्मपुरी), मणेर मशीद, शहाजमाल मशीद, रंकाळा मशीद, मदिना मशीद, बागल चौक येथील कब्रस्तान मशीद , प्रगती कॉलनी मशीद, शाहूपुरी मशीदसह शिरोली मदरसा, बडी मशीद, बिंदू चौक, लक्षतीर्थ वसाहत येथील विश्वास कॉलनी मदरसा, सिरतनगर मोहल्ला मशीद, कसबा बावडा शाहीनामे मशीद , विक्रमनगरमधील घुडणपीर मशीद आदी ठिकाणी नमाज पठण झाले.दरम्यान, मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर दुसऱ्या जमातच्या नमाजकरिता हाफिज आकिब म्हालदार व तिसरी जमातसाठी मौलाना रहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले.यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक तानाजी सावंत, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गुप्तवार्ताचे निरीक्षक निशिकांत भुजबळांच्यासह सर्वधर्मियांचे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, साजिद खान, अमीर हमजेखान शिंदी ,जहाँगीर अत्तार, मुसा पटवेगार, रफिक मुल्ला, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्यांचे वाटप करण्यात आले. राजकीय नेत्यानी किरवली पाठ...दरवर्षी बकरी ईदवेळी शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह लोकप्रतिनिधी मुस्लिम बोर्डिंगमध्ये हजेरी लावतात. यंदा मात्र,कोणत्याही पक्षांचे नेते अथवा लोकप्रतिनिधी फिरकले नसल्याचे दिसून आले. यावर्षी कोणतीही निवडणूक नसल्यामुळे नेते या ठिकाणी आले नसल्याचे यावेळी चर्चा होती.मुलांमध्ये उत्साह...मुस्लिम बोर्डिंगमध्ये मंगळवारी सकाळपासूनच मुस्लिमबांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांच्यासह मुलांचा समावेश होता. त्यामुळे याठिकाणी उत्साहाचे वातावरण होते.