शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकच्या सलग दुसऱ्या दिवशी शहर रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 19:03 IST

CoronaVirus Kolhapur : लॉकडाऊनच्या कडक निर्बंधातून पाच दिवसांची शिथिलता दिल्याच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकरांनी रस्त्यावर धाव घेतल्याने रस्तेही गर्दीने ओसंडले. वाहतुकीचा ताण आल्याने शहरातील मुख्य मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलही सुरू झाल्याने गर्दीत आणखीन भर पडली. कोरोनाला मानगुटीवर घेऊनच कोल्हापूरकरांनी मंगळवारी दुपारी चारपर्यंत मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. खाऊगल्ली ते सराफ दुकाने सर्वत्र लोक तुटून पडल्यासारखे चित्र होते, याला अपवाद फक्त हॉटेलचा राहिला. तेथे केवळ पार्सल सेवा असल्याने गर्दी नव्हती.

ठळक मुद्देअनलॉकच्या सलग दुसऱ्या दिवशी शहर रस्त्यावर

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कडक निर्बंधातून पाच दिवसांची शिथिलता दिल्याच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकरांनी रस्त्यावर धाव घेतल्याने रस्तेही गर्दीने ओसंडले. वाहतुकीचा ताण आल्याने शहरातील मुख्य मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलही सुरू झाल्याने गर्दीत आणखीन भर पडली. कोरोनाला मानगुटीवर घेऊनच कोल्हापूरकरांनी मंगळवारी दुपारी चारपर्यंत मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. खाऊगल्ली ते सराफ दुकाने सर्वत्र लोक तुटून पडल्यासारखे चित्र होते, याला अपवाद फक्त हॉटेलचा राहिला. तेथे केवळ पार्सल सेवा असल्याने गर्दी नव्हती.व्यापाऱ्यांच्या आग्रहास्तव शुक्रवारपर्यंत पाच दिवसांसाठी सरसकट दुकाने सुरू करण्याची विशेष सवलत कोल्हापूर शहरापुरती मिळाली आहे. अनावश्यक गर्दी करणार नाही, नियमांचे पालन करणार, असे व्यापाऱ्यांनी सांगून देखील प्रत्यक्षात सोमवारपासून दुकाने सुरू झाल्यापासून कोरोना आहे, लॉकडाऊन आहे, याचाच विसर पडल्यासारखी शहरात स्थिती आहे.

मंगळवारीदेखील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, गुजरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड या प्रमुख व्यापारी मार्गांवर हेच चित्र कायम होते. जिकडे नजर टाकेल तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती. विशेषत: कपड्यांच्या दुकानात गर्दी जास्त दिसत होती. याशिवाय भांडी, सौंदर्य प्रसाधनासह किरकोळ वस्तूंच्या दुकानातही बऱ्यापैकी वर्दळ होती.जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने अडीच महिन्यांपासून बंद असल्याने बरेचसे साहित्य मिळण्यात अडचणी येत होत्या. मागच्या दाराने गेल्या महिनाभरापासून व्यापारी मागणीप्रमाणे ग्राहकाला माल पुरवत असले तरी त्यालाही मर्यादा येत होत्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर