शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे आरोग्य: इचलकरंजी, गडहिंग्लज बनले 'हेल्थ सेंटर्स'; डिजिटल एक्सरे, सोनाग्राफी, डायलेसिसचीही सोय

By समीर देशपांडे | Updated: January 3, 2025 16:44 IST

समीर देशपांडे  कोल्हापूर : राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाही आता कात टाकत असून गडहिंग्लज, इचलकरंजीला सिटी स्कॅन केले जाते आणि ...

समीर देशपांडे कोल्हापूर : राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाही आता कात टाकत असून गडहिंग्लज, इचलकरंजीला सिटी स्कॅन केले जाते आणि मुंबई, बंगळुरू व पुण्यातून तातडीने त्याचा अहवाल देण्याची सोय शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली आहे. सिटी स्कॅन, डिजिटल एक्से, सोनोग्राफी आणि डायलेसिसचीही सोय उपलब्ध झाली आहे. या सर्व यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक असून अनेक ठिकाणी किरकोळ निधीसाठी यंत्रणा ठप्प होण्याचाही प्रकार पहावयास मिळत आहे.कोल्हापूर शहरातच कसबा बावड्याजवळील सेवा रुग्णालय, गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय आणि इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालय ही अतिमहत्त्वाच्या सेवा देणारी आरोग्य केंद्रे बनली आहेत. या ठिकाणी गेल्या दोन वर्षात आवश्यक मनुष्यबळ पुरवठा, यंत्रसामग्री पुरवण्यात आल्यामुळे येथे एकाच ठिकाणी अनेक सुविधा रुग्णांना उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

कसबा बावड्याच्या सेवा रुग्णालयात पूर्णवेळ रेडिओलॉजिस्ट आहे. लहान फिजिओथेरपीची गरज असणाऱ्या बालकांसाठी ‘डे केअर युनिट’आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या तपासण्या करून त्यांना मार्गदर्शन करणारी यंत्रणाही आहे. १५० हून अधिक नागरिक रोज या ठिकाणी येतात. कर्करोगाच्या रुग्णांसाठीही दैनंदिन तपासणी असून या ठिकाणी या रुग्णांचे समुपदेशनही करण्यात येते. औषध, गोळ्या दिल्या जातात. नाक, कान, घशाच्या सर्व चाचण्या येथे मोफत होतात.इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात डायलेसिसच्या चार मशिन्स तयार आहेत. त्यासाठी १६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यापासून रोज नेत्रोपचाराची सोय या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. बहुतांशी सर्व रुग्णालयांसाठी जनरेटरचा पुरवठा करण्यात आला आहे. सोनोग्राफी मशिन्स पुरवण्यात आल्या आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी शीत शवपेट्या पुरवण्यात आल्या आहेत.सेवा रुग्णालय, आयजीएम, कोडोली आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पूर्णवेळ रेडिओलॉजिस्ट देण्यात आल्यामुळे अहवाल वेळेत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आठवड्यातून एक वेळ गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात रेडिओलॉजिस्टची सोय करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वी शासनाने कृष्णा डायग्नोसिस कंपनीच्या माध्यमातून डिजिटल एक्सरे आणि सिटी स्कॅनची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय आणि इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात सिटी स्कॅन केले जाते किंवा डिजिटल एक्स-रे काढला जातो. या कंपनीच्या बंगळुरू, मुंबई, पुणे येथील विशेषतज्ज्ञांकडे तो ऑनलाइन पाठविण्यात येतो. जर आरेाग्याचा गंभीर प्रश्न असेल तर तातडीने संबंधितांकडून त्याचा अहवाल दिला जातो. त्यानुसार पुढच्या प्रक्रियेचा निर्णय घेण्यात येतो.

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील आरोग्य व्यवस्था

  • ग्रामीण रुग्णालये - १५
  • २०० बेडचे सामान्य रुग्णालय - ०१
  • १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय - ०१
  • ५० बेडची उपजिल्हा रुग्णालये - ०४
  • एकूण शासकीय रुग्णालये - २१

निधीची अडचणमहाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील सर्व रुग्णालयांमधून मोफत उपचाराची घोषणा केल्याने आता केस पेपरचे पैसेही जमा केले जात नाहीत. याआधी केसपेपरच्या माध्यमातून जमा झालेला निधी स्थानिक पातळीवर छोट्या, माेठ्या गोष्टींसाठी वापरता येत होता. परंतु आता केसपेपरच नसल्याने स्थानिक पातळीवरील गरजा भागविण्यासाठी रुग्णालयाकडे पैसेच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती देईल त्या निधीवरच अवलंबून रहावे लागते. हा मिळालेला निधी अधिकाधिक औषधांच्या खरेदीसाठीच वापरावा लागतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल