शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोल्हापूर शहरात ‘जी. एस.’ निवडीचा जल्लोष, कॉलेज कॅम्पस् दणाणला; दुरंगी, तिरंगी लढती रंगल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:22 IST

शिवाजी विद्यापीठासह शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शांततेत जनरल सेक्रेटरी (सचिव, जी. एस.) पदासाठी निवडणुका पार पडल्या. विजयाच्या घोषणा, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांच्या कडकडाटातील विजयी फेरी, मोटारसायकल रॅली काढून विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी कॉलेज कॅम्पस्मध्ये जोरदार जल्लोष केला. काही महाविद्यालयात तिरंगी-दुरंगी लढती रंगल्या.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात ‘जी. एस.’ निवडीचा जल्लोषशिवाजी विद्यापीठासह कॉलेज कॅम्पस् दणाणलादुरंगी, तिरंगी लढती रंगल्या

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठासह शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शांततेत जनरल सेक्रेटरी (सचिव, जी. एस.) पदासाठी निवडणुका पार पडल्या. विजयाच्या घोषणा, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांच्या कडकडाटातील विजयी फेरी, मोटारसायकल रॅली काढून विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी कॉलेज कॅम्पस्मध्ये जोरदार जल्लोष केला. काही महाविद्यालयात तिरंगी-दुरंगी लढती रंगल्या.विद्यापीठाच्या कायद्यातील तरतुदी, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात जी. एस. पदासाठीच्या निवडणुका झाल्या. शहाजी लॉ कॉलेजमध्ये जीएस पदासाठी सचिन बोभाटे, धनश्री पाटील, ओंकार मगदूम, जुबेर मकानदार यांनी अर्ज दाखल केले. यातील ओंकारचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला. त्यामुळे जुबेर, सचिन आणि धनश्री यांच्या लढत झाली. यात सहा मतांसह जुबेर विजयी ठरला.

सचिनला चार, तर धनश्रीला तीन मते मिळाली. या निवडणूक प्रक्रियेवेळी प्राचार्य आर. नारायणन्, जिमखाना अध्यक्ष व्ही. टी. पोवार, एम. सी. शेख, अनिल घाटगे उपस्थित होते. जुबेर हा प्री-लॉच्या अंतिम वर्षात शिकत आहे. हिंदुराव घाटगे कॉलनी कदमवाडी येथे तो राहतो.

कमला महाविद्यालयात एम. ए. भाग दोनची विद्यार्थी किशोरी पसारे आणि तारा दिवेकर यांच्या लढत झाली. यात बारा मतांसह किशोरी हिने बाजी मारली. तारा हिला नऊ मते मिळाली, तर दोन मते अवैध ठरली. निवडणुकीची प्रक्रिया प्राचार्य जे. बी. पाटील, एस.एम. काळे, एन. एस. शिरोळकर, वर्षा साठे, वर्षा मैंदर्गी, निता धुमाळ यांनी पार पाडली.

निवडी होताच विजयी उमेवारांच्या समर्थकांनी महाविद्यालय परिसरात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. तर, काहींनी वाद्यांच्या गजरात मोटारसायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. दुपारी दोनपर्यंत बहुतांश महाविद्यालयातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. सकाळपासून कॉलेज कॅम्पस्ने निवडणुकीचे वातावरण अनुभवले. या निवडणूकांवेळी महाविद्यालयांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शहाजी कॉलेजच्या जीएस पदी ओंकार पाटील

दसरा चौकातील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या २०१७ -१८ विद्यार्थी मंडळ निवडणूक जनरल सेक्रेटरीपदी (जीएस)ओंकार सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तर अमित राजेश चव्हाण यांची विद्यापीठ प्रतिनिधी (युआर) पदी निवड झाली.विद्यापीठ प्रतिनिधीपदी दोन उमेदवारांनी अर्ज केले होते. एकूण १९ मतदरांच्या मतदानातून अमित राजेश चव्हाणने १३ मते मिळवून पूजा पंडित खवरे हिचा ५ मतांनी पराभव केला. विजय उमेदरवारांच्या मित्रांनी गुलालांची उधळकरून एकच जल्लोष केला.

निवडणूक प्रक्रियेत संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, मानद सचिव विजयराव बोंद्रे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.एकनाथ काटकर, आय.क्यु.एस.सी. समन्वयक डॉ. आर. के. शानेदिवाण, जिमखाना प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजी जाधव, डॉ. राहूल मांडणीकर, प्रबंधक रविंद्र भोसले, अधिक्षक मनिष भोसले यांचे सहकार्य लाभले.

‘विवेकानंद’ कॉलेजच्या जीएसपदी अक्षय पाटील

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिवपदी अक्षय प्रकाश पाटील यांची निवड झाली. बी.ए.भाग - ३ विद्यार्थी आहे.विद्यार्थी मंडळ सचिवपदी एकूण तीन विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये शिवाणी विठ्ठल पाटील हिला १३ तर कोमल मनोहर पाटील हिला २ मते मिळालीत. निवडणूकी प्रक्रियेत डॉ.डी.बी.पाटील, जिमखाना चेअरमन प्रा. किरण पाटील, एन.सी.सी. प्रमुख डॉ. एम. जी. गावडे, डॉ. डी.सी.कांबळे, डॉ.व्ही.सी. महाजन, प्रा. डी.ए.पवार, रजिस्ट्रार सी.बी. दोडमणी, हितेंद्र साळुंखे, रवी चौगुले यांनी काम पाहिले.महावीर कॉलेजच्या जीएसपदी असफाक शिकलगारमहावीर महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिवपदी असफाक हसन शिकलगार यांची एक मताने निवड झाली. स्नेहल सुहास पाटील अर्ज दाखल केला होता. असफाक यांना १० तर स्नेलह यांना ९ मते मिळाली. अवघ्या एक मतांनी असफाक यांनी विजय मिळविला. निवडणूक प्रक्रियेत प्राचार्य आर. पी. लोखंडे, अमरदिप नाईक, प्रा. डॉ. भरत नाईक, रोहित पाडवी, प्रा. डॉ. सुजाता पाटील, प्रा. डॉ. रोहित पाटील यांनी काम पाहिले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालयElectionनिवडणूक