या मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीमुळे होणारा त्रास थांबवावा. यासाठी गेल्या दहा वर्षांपासून मी आणि अन्य काही ज्येष्ठ नागरिक पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. त्यावर मार्ग एकेरी झाला. पण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने येथील रोजच्या किमान पाच तासांच्या वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायम आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने आणि त्वरित पावले उचलावीत. त्यात या मार्गाच्या प्रवेशावर सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. यु-टर्न घेण्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी दुभाजक बसवावा. बेशिस्त वाहनधारकांवर कडक कारवाई करावी.
- दीपक मिरजे, ज्येष्ठ नागरिक, रुक्मिणीनगर
चौकट
बिनधास्तपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन
उड्डाण पुलावरून ताराराणी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी व्हिक्टर पॅलेसकडील सेवा मार्गावर जाण्यासाठी यु-टर्न घेऊ नये, असा फलक लावण्यात आला आहे. मात्र, सर्रासपणे वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करून यु-टर्न घेतात. रुक्मिणीनगरातील मार्ग आणि व्हिक्टर पॅलेस व स्टार बझारकडील सेवा रस्ते हे वन-वे असताना, त्याबाबतची सूचना देणारे फलक तेथे असतानाही बिनधास्तपणे अनेक वाहनधारक रोज या वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. कारवाई होत नसल्याने या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.
पाँईटर
वाहतूक कोंडी होण्याची कारणे
१) तावडे हॉटेल आणि शिवाजी विद्यापीठाकडून उड्डाण पुलावरून येणाऱ्या वाहनधारकांकडून शॉर्टकट म्हणून रुक्मिणीनगरमधील रस्त्याचा वापर
२) यु-टर्न घेण्याच्या मनाईबाबतच्या नियमाचे उल्लंघन
३) व्हिक्टर पॅलेस, स्टार बझारकडील सेवा रस्त्यावर वन-वेच्या नियमाचे उल्लंघन
४) वन-वे असतानाही रुक्मिणीनगर ते निरामय हॉस्पिटल मार्गावर सुरू असलेली दुहेरी वाहतूक
फोटो (०४०२२०२१-कोल-रूक्मिणीनगर रस्ता ०१, ०२, ०३ व ०४) : कोल्हापुरातील टेंबलाईवाडी उड्डाण पुलावरून ताराराणी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी व्हिक्टर पॅलेसकडील सेवा मार्गावर जाण्यासाठी यु-टर्न घेऊ नये, असा फलक लावण्यात आला आहे. मात्र, सर्रासपणे वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करून यु-टर्न घेतात. त्यामुळे रुक्मिणीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर रोज वाहतुकीची कोंडी होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (०४०२२०२१-कोल-रूक्मिणीनगर रस्ता ०५, ०६, ०७ ) : कोल्हापुरातील रुक्मिणीनगर ते निरामय हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता वन-वे असताना आणि त्याबाबतची सूचना देणारे फलक तेथे असतानाही बिनधास्तपणे अनेक वाहनधारक रोज या वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे येथे रोज वाहतुकीची कोंडी होत आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)