शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या ताकदीवर सर्कीट बेंच मिळवू : ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:54 IST

कोल्हापूर : कोल्हापूरला सर्कीट बेंच व्हावे यासाठी ३२ वर्षापासून आंदोलन सुरु आहे. कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा हा प्रश्न बनला आहे. आता ...

ठळक मुद्देजनतेच्या ताकदीवर सर्कीट बेंच मिळवू : ज्येष्ठ नेते एन.डी. पाटीलकोल्हापुरात सर्कीट बेंचसाठी वकीलांचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूरला सर्कीट बेंच व्हावे यासाठी ३२ वर्षापासून आंदोलन सुरु आहे. कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा हा प्रश्न बनला आहे. आता यश जवळ आले असून जनतेच्या ताकदीवर सर्कीट बेंच मिळवू, असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोल्हापुरात सर्कीट बेंचसाठी मंगळवारी जिल्ह्यातील वकीलांनी कामकाजापासून अलिप्त राहत कसबा बावडा येथील न्याय संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.एन.डी. पाटील म्हणाले, वकीलांचा ३२ वर्षाचा संघर्ष आणि महाराष्ट्रातील बदलेले वातावरण यामुळे संर्कीट बेंचचा निर्णय लवकरच होईल, असे चित्र आहे. हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी जनतेच्या ताकदीवर नव्याने जोमाने लढा उभारला जाईल. अखेरचा श्वास असे पर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. सर्कीट बेंचसाठी अनुकूल वातावरण आहे. यश आपलेच आहे ते केवळ खेचून आणायचे बाकी आहे.

यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे, ज्येष्ठ वकील डी.बी. भोसले, प्रसाद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अजित मोहिते, खंडपीठ कृती समितीचे आर.के. पोवार, बाबा पार्टे, गणी आजरेकर, अशोक पोवार, रमेश मोरे, दिलीप पवार, भगवान काटे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर