शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

‘सर्किट बेंच’ची फाईल हाय कोर्टात सादर

By admin | Updated: August 31, 2015 23:23 IST

मुख्य न्यायाधिशांचे रजिस्टारनी स्वीकारली फाईल

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सहा जिल्'ांसाठी कोल्हापूर येथे स्थापन करावे, यासाठी सहा जिल्'ांच्या मागणीचे ठराव व संस्थानकाळातील कोल्हापुरातील खंडपीठाच्या माहितीची फाईल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांचे रजिस्टार एस. एन. जोशी व जनरल रजिस्टार मंगेश पाटील यांच्याकडे खंडपीठ कृती समितीने सादर केली. ही फाईल न्यायाधीश शहा यांच्यासमोर ठेवली जाईल, असे आश्वासन यावेळी रजिस्टारनी कृती समितीला दिले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसभर मुख्य न्यायाधीश शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता झाली नाही. कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि. २१) गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या इमारतीमध्ये कृती समितीबरोबर मुख्य न्यायाधीश शहा यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी कोल्हापूर कार्यक्षेत्रातील प्रलंबित खटले, प्रस्तावित सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्'ांचे कोल्हापूरपासून अंतर किती आहे, पक्षकारांना कोल्हापुरात येण्यासाठी कशा पद्धतीची सोय आहे, याची माहिती घेतली तसेच कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीच्या सहा जिल्'ांच्या ठरावाच्या प्रती व संस्थानकाळातील खंडपीठाची माहिती मागविली होती. त्यानुसार कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. चव्हाण, सुस्मित कामत, मिलिंद जोशी, विजय ताटे, धनश्री चव्हाण, आदींनी संस्थान काळातील राजाराम महाराजांच्या काळात सुरू असलेली माहिती संग्रहित करून फाईल तयार केली होती.काही तज्ज्ञ वकिलांकडून यासंदर्भात मार्गदर्शनही घेतले होते. त्यानंतर ही फाईल सोमवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्टार जोशी व पाटील यांच्याकडे सादर केली. यावेळी कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, माजी उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, सचिव रवींद्र जानकर, डी. एन. जाधव, के. व्ही. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांची भेट झाली नाही; परंतु त्यांचे रजिस्टार एस. एन. जोशी व जनरल रजिस्टार मंगेश पाटील यांच्याकडे ‘सर्किट बेंच’च्या माहितीची फाईल सादर केली आहे. यासंदर्भात दोन दिवसांत न्यायाधीश शहा यांच्या निर्णयाची माहिती घेतली जाईल. - अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, (निमंत्रक खंडपीठ कृती समिती)