शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
2
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
3
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
4
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
5
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
6
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
7
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
8
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
9
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
10
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
11
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
12
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
13
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
14
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
15
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
16
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
17
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
18
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
19
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
20
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट

सर्किट बेंचसाठी कोल्हापूरात वकिलांचा असहकार कायम, न्यायालयाबाहेर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 17:46 IST

सर्किट बेंचसाठी वकीलांनी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुकले. सोमवारपासून १ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने घेतला. त्यानुसार वकीलांनी न्यायालयाच्या बाहेर ठिय्या मांडला. त्यांच्या आंदोलनास दिवसभरात पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठींबा दिला.

ठळक मुद्देवकिलांचा असहकार कायम, न्यायालयाबाहेर ठिय्या परिसरात शुकशुकाट : पक्षकारांची गैरसोय

कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी वकीलांनी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुकले. सोमवारपासून १ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने घेतला. त्यानुसार वकीलांनी न्यायालयाच्या बाहेर ठिय्या मांडला. त्यांच्या आंदोलनास दिवसभरात पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठींबा दिला. वकीलांच्या असहारामुळे न्यायालयात शुकशुकाट होता. पक्षकाराची मात्र गैरसोय झाली.

कोल्हापूर सर्किट बेंचला अंतिमत: मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत विविध मार्गांचा अवलंब करण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. सर्किट बेंचबाबत सहा जिल्'ांतील वकिलांच्या भावना तीव्र आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी या प्रश्नी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिधुदूर्ग या सहा जिल्हयांसाठी कोल्हापूरात मध्यवर्ती ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी गेल्या ३४ वषार्पासून वकील संघटना आंदोलन करीत आहेत. वकीलांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. २५ मार्च ते १ एप्रिल असे आठ दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व वकील जिल्हा न्यायालयाच्या कमानीच्या बाहेर उभारलेल्या मंडपात बसून होते.न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या पक्षकारांना वकीलांचे आंदोलन सुरू आहे, असे समजल्यावर त्यांचे काम झाले नाही, पुढील तारीख घेऊन परतावे लागले. त्यातून पक्षकारांना गैरसोय झाली. खटल्यांचे कामकाज सुरू करण्यासाठी वकीलच उपलब्ध नसल्याने न्यायालयात दिवसभर शुकशुकाट दिसत होता.

यावेळी माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, अ‍ॅड. अजित मोहिते, प्रशांत मोरे, विवेक घाटगे, महादेवराव आडगुळे, सतिश खोतलांडे, राजेंद्र मंडलिक, बाळासाहेब पाटील, विजय महाजन, चारुलता चव्हाण, स्वाती तानवडे, दीपाली पवार, धैर्यशील पवार, ओंकार देशपांडे, अभिषेक देवरे, अभिजित कापसे, रणजित गावडे, सचिन पाटील, प्रशांत पाटील, मनोज पाटील, हेमंत रणदिवे, अशोक पाटील, तेहजीब नदाफ, अरविंद मेहता, गुरुप्रसाद माळकर, राजवर्धन पाटील, राजेंद्र मंडलिक, कुलदीप मंडलिक, सचिन आवळे, अतुल जाधव, निशांत वणकुंद्रे, दीपक पाटील, व्ही. आर. पाटील, असुमन कोरे, लालासो पाटील, एस.बी. पाटील, संतोष पाटील आदी वकील ठिय्यामध्ये सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर