शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील बागेची चित्रपटसृष्टीलाही भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:54 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : दूधगंगा नदी आणि जयसिंगराव तलाव, पाझर तलाव यांच्यामध्ये वसलेल्या कागल शहरात ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : दूधगंगा नदी आणि जयसिंगराव तलाव, पाझर तलाव यांच्यामध्ये वसलेल्या कागल शहरात वृक्षसंपदा कमी नाही. सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र शासनाचा जैव विविधता पार्क येथे आहे. याचबरोबर कागल नगरपालिकेच्या तीन बागा, शाहू साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयासमोरील बगीचा कागलचे सौंदर्य खुलविण्याचे काम करीत आहेत. जयसिंगराव पार्कातील श्रीमंत विजयादेवी घाटगे बगीचा पर्यटकांना आकर्षित करणारा, तर कारखाना कार्यालयासमोरील बगीचा ज्येष्ठ नागरिकांपासून शहरात कामानिमित्त आलेल्या लोकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. काही किरकोळ अपवाद वगळता शहरातील बागबगीचे ठिकठाकच आहेत.शहरातील निपाणी वेसजवळ असणारे राजर्षी शाहू उद्यान जुने आहे. येथे आकर्षक झाडे आहेत. लहान मुलांसाठी खेळणी आहेत. यातील काही मोडली गेली आहेत. येथील कारंजाही बंद आहे. येथील बगीचाही साधारणच आहे. छत्रपती संभाजीराजे चौकाजवळ असणारे छत्रपती शिवाजी बालोद्यान हे देखील एकेकाळी शहरातील नागरिकांना आकर्षित करणारे उद्यान होते. येथील कोरवी खण मुजवून हे उद्यान विकसित केले होते. कालांतराने पालिकेचे दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे सध्या येथे केवळ नावापुरते बालोद्यान आहे. येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राला ही जागा दिल्याने तेथे मंदिर उभारले गेले आहे. आमदार हसन मुश्रीफ हे मंत्री असताना कागल शहरासाठी जवळपास दोन एकर जागेत जो विशेष बगीचा मंजूर करून आणला, त्यास कागलचे भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या पत्नी कै. श्रीमंत विजयादेवी घाटगे यांचे नाव दिले आहे. शहरातील सर्वांत सुंदर असा हा बगीचा आहे. याशिवाय यशवंत किल्ला अ‍ॅम्युझमेन्ट पार्क, पाझर तलाव येथील कै. व्ही. ए. घाटगे बोटिंग क्लबवरही बगीचा विकसित करण्याचा प्रयत्न पालिकेने केला, पण तो अर्धवटच राहिला आहे. नगरपालिकेने यापूर्वी जयसिंगराव तलावाजवळ हर्बल गार्डन, जैव विविधता पार्क उभारण्याच्या घोषणा सर्वसाधारण सभेत झाल्या, पण त्या हवेतच राहिल्या आहेत.सध्या शहरात झपाट्याने उपनगरे तयार होत आहेत. तेथे बगीच्यासाठी जागा आरक्षित करणे आणि तेथे उद्याने तयार करण्याकडे पालिकेने लक्ष दिले पाहिजे. खरे तर भूखंड विकसित करणाऱ्याकडेच ही जबाबदारी दिली पाहिजे. बगीच्यातून सकाळी सकाळी फेरफटका मारावा, व्यायाम करावा, अशा उद्यानांचीही अजून गरज आहे. बगीच्यामधील साहित्याची मोडतोड हाही चिंतेचा विषय आहे.राणी विजयादेवी गार्डनचे आकर्षणया बगीच्याची रचना आणि उभारणी अत्यंत आकर्षक आहे. पालिकेने देखरेखही चांगली ठेवली आहे. दोन एकर जागेत पसरलेल्या या बगीच्यात कारंजा, छोटे पूल, पर्णकुटी, सजावट कमानी, उंच कमानी असणारी गॅलरी, भिंत असलेले संवाद केंद्र, हिरवळीचे गालिचे, विविध झाडे, फुले यांनी हा बगीचा बहरलेला आहे. येथे एका हिंदी, तर तीन मराठी चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. बागेत प्रवेशासाठीही दोन रूपयाचे तिकीट आकारले जाते.राजर्षी शाहू उद्यानाला विशेष महत्त्व..डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरालगत असलेल्या राजर्षी शाहू उद्यानाला विशेष महत्त्व आहे. येथे राजर्षी शाहूंचा शहरातील पहिला सार्वजनिक अर्धपुतळा १९६६ला उभारण्यात आला. हा पुतळा करवीरचे तत्कालीन छत्रपती शहाजी महाराज यांनी भेट दिला आहे. शाहू कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेपूर्वी येथूनच क्रीडाज्योत नेली जाते. दलदलीने भरलेला छोटा तलाव मुजवून हे उद्यान विकसित करण्यात आले.‘शाहू’चा बगीचा विरंगुळ्यासाठीबाहेरगावाहून शासकीय व अन्य कामासाठी आलेले नागरिक विश्रांती, शिदोरी खाण्यासाठी शाहू साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयासमोरील बगीच्यात येतात. ऐतिहासिक इमारत, छत्रपती शाहूंचा भव्य पुतळा, सजावट, नारळाची झाडे, हिरवळीचे गालिचे आणि महामार्गालगतच्या ठिकाणामुळे येथे दिवसभर लोक येत असतात. सायंकाळी स्थानिक लोक येतात.