शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

वस्त्रनगरी बनतेय ‘क्राईम’नगरी

By admin | Updated: April 1, 2015 00:05 IST

पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’ : अवैध धंदे पुन्हा डोके वर काढताहेत

अतुल आंबी - इचलकरंजी शहरातील पोलीस दलात काही बदल झाले आणि अंतर्गत नियोजन बिघडत गेले. चोऱ्यांचे प्रमाण वाढत गेले. धूम स्टाईलने दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे, वाहनांवरून जाणाऱ्या लोकांच्या बॅगा चोरून लाखो रुपये पळवून नेणे, यासह घरफोड्या, आॅनलाईन बॅँक खात्यावरून चोरी, वाटमारी, शस्त्रांचा धाक दाखवून वेळप्रसंगी मारहाण करून जबरी चोऱ्या यांचा सपाटाच सुरू झाला. आता जिल्ह्यातील मोठा दरोडा इचलकरंजीतील भरवस्तीत पडला. यामध्ये सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला. मात्र, पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’ परिस्थितीतूनच जाताना दिसत आहे.शहराची वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर वाढता गुन्हेगारी आलेख पाहता नव्याने एक पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक निर्माण केले. शहरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सर्व रिक्त पदे भरली. त्यामुळे शहर पोलीस दलाची संख्या सुमारे ३००च्या वर पोहोचली. आता चोरी, मारामारी यासह अवैध व्यवसायांवर अधिक जरब बसणे गरजेचे होते. मात्र, परिस्थिती वेगळीच झाल्याचे चित्र आहे. आता हळूहळू अवैध व्यवसायिकही आपले डोके वर काढताना दिसत आहेत. शहर परिसरात किरकोळ स्वरूपात उघडपणे मटका, जुगार, गावठी दारूचे अड्डे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वी भरचौकात पडलेल्या दरोड्यामुळे तर पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे. विशेष म्हणजे साडेचार कोटींचा मुद्देमाल लुटून नेला असला, तरी पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा गतिमान न करता हद्दीचा वाद व पाहणी तपासणी करण्यात वेळ काढला. त्यामुळे पाठलाग किंवा नाकाबंदी होऊ शकली नाही. त्याचबरोबर पोलिसांवर येणारे अधिकाऱ्यांचे गंडांतर यामुळे कित्येक पोलिसांचे खबरे दुरावले गेले आहेत, तर कित्येक नव्याने आलेले अधिकारी व पोलीस अबोल असल्यामुळे त्यांचे खबऱ्यांचे नेटवर्कच नाही. त्यामुळे अशा खबऱ्यांच्या माध्यमातून उघडकीस येणारे गुन्हे थांबले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून शहरातील पोलीस यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.एस. चैतन्य गप्प का ?आयपीएस अधिकारी एस. चैतन्य यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यावसायिकांवर त्यांनी बसविलेली जरब हळूहळू ढिली होत चालल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. चैतन्य यांची बदली झाली का?, त्यांच्या अधिकारावर कोणते बंधन आले का? यासह अनेक प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित केले जात आहे.खाबुगिरीमुळे परिस्थिती बदललीहद्दीतील अवैध व्यवसाय मोडून निघावेत, सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन सुरळीतपणे चालावे, उद्योजक, व्यापारी यांनी निर्भयपणे आपला व्यवसाय करावा, अशी प्रामाणिक इच्छा बाळगून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणारे अनेक पोलीस कार्यरत आहेत. त्यांनी एस. चैतन्य यांना चांगली साथ दिल्यानेच सर्व काही शक्य झाले होते. मात्र, खाबुगिरी मानसिकतेच्या काही पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांमुळे सध्या परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे.