शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परिपत्रक चुलीत घाला, आधी कनेक्शनचे बोला- शेतकऱ्यांचे खडेबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:41 IST

शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत

ठळक मुद्देमहिन्यात कनेक्शन न दिल्यास कुलूप लावू

कोल्हापूर : शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत, कनेक्शन कधी देणार ते सांगा’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. प्रलंबित कनेक्शन महिन्याभरात न दिल्यास १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशाराही देण्यात आला.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकरी पाच वर्षे वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. महावितरणची डिपॉझिट भरूनही विभागातील १0 हजार शेतकरी कनेक्शन कधी मिळणार, यासाठी हेलपाटे मारत आहेत. बोअरवेल, विहिरी खोदल्या; पण कनेक्शन नसल्याने पाणी उपसा कसा करायचा, असा पेच आहे; त्यामुळे वीज जोडणी कधी देणार; यासाठी सोमवारी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी यावेळी उपस्थित होते.

मागण्यांचे निवेदन विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना देण्यात आले. शेतकºयांनी पैसे भरूनही कनेक्शन का दिले जात नाही. तुमचा ठेकेदार नेमका कोठे काम करीत आहे. जाणीवपूर्वक पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना टार्गेट केले जात असून, प्रामाणिक वीज भरणाºयांना अशी शिक्षा देणार असाल, तर हे खपवून घेणार नसल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता शैलेश राठोड हे शेतकºयांशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.

शेतीपंपांना आठ तास वीज दिली म्हणून त्याप्रमाणे वसुली केली जाते; पण प्रत्यक्षात पाच ते सहा तासच वीज मिळत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. पैसे भरून शेतकºयांनी किती वर्षे वाट बघायची, महिन्यात प्रलंबित कनेक्शन दिली नाही, तर १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशारा विक्रांत पाटील यांनी दिला.दरम्यान, उपसाबंदी विरोधात इरिगेशन फेडरेशनने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना निवेदन दिले.पाच वर्षांत १६६ कनेक्शनमहावितरणच्या कनेक्शन जोडणीच्या गतीवर जोरदार टीका करताना विक्रांत पाटील म्हणाले, पाच वर्षांत केवळ १६६ कनेक्शन जोडण्यात आली. यावरून तुमच्या कामाची गती किती हे लक्षात येते.इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी प्रलंबित शेतीपंपांना वीज कनेक्शन द्यावे, या मागणीचे निवेदन महावितरणचे विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना दिले. यावेळी बाबासाहेब पाटील, प्रताप होगाडे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणStrikeसंप