शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांची विशेष प्रार्थना; सुट्टीमुळे शहर फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:09 IST

देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो, अशी प्रार्थना करीत व विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण बुधवारी मोठ्या धार्मिक वातावरणात व उत्साहात ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. शहरासह जिल्हाभरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या.

ठळक मुद्देनाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांची विशेष प्रार्थनासुट्टीमुळे शहर फुलले

कोल्हापूर : देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो, अशी प्रार्थना करीत व विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण बुधवारी मोठ्या धार्मिक वातावरणात व उत्साहात ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. शहरासह जिल्हाभरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या.कॅरोल गायनाची रात्रभर सुरू असलेली धूम, शहरातील विविध चर्चवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, विविध कार्यक्रमांची रेलचेल, नवनवीन वस्त्रे परिधान करून प्रार्थनेसाठी आलेले ख्रिस्ती बांधव एकमेकांना देत असलेल्या शुभेच्छा अशा भारावलेल्या वातावरणात चर्च आणि परिसरात जोशपूर्ण उत्साही वातावरणात प्रभू येशूचा जन्मदिन साजरा करण्यात आला.शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, होली इव्हॅँजलीस्टस चर्च, आॅल सेंट्स चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज ख्रिश्चन चर्च यांसह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून नाताळची लगबग जिल्हाभरात सुरू होती.

तीन दिवसांपूर्वी कॅरोल गायनाची सुरुवात झाली. क्वायर गु्रप घरोघरी जाऊन नाताळची गाणी गात होते. बुधवारी मध्यरात्री रात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करून नाताळ सणाचे स्वागत करण्यात आले. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून नाताळच्या भक्ती उपासनेला सुरुवात झाली. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर