शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

स्वत:चे समाधान ज्या क्षेत्रात तेच करिअर निवडा : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:03 IST

एज्युकेशन गुरूचे कुणाल पाटील म्हणाले, भविष्यातील संधीचा विचार करून अभ्यासक्रम निवडावा. आॅस्ट्रेलिया, कॅनडा, आदी परदेशांतील शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगितली.

ठळक मुद्दे लोकमत मीडिया पार्टनर एज्युकेशन गुरू व एमबर्कतर्फे ‘रिडिफाईन २०२०’ कार्यशाळा

कोल्हापूर : प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या जरी वेगळ्या असल्या तरी स्वत:चे समाधान ज्या क्षेत्रात आहे, त्याच क्षेत्रात करिअर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

शाहू स्मारक भवन येथे बुधवारी एज्युकेशन गुरू व एमबर्क यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिडिफाईन २०२०’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचे लोकमत मीडिया पार्टनर होते.

देसाई म्हणाले, करिअर निवडताना विद्यार्थ्यांचा निर्णय हा मित्र-मैत्रिणींच्या निर्णयाला साजेसा असावा, असे वाटते. यात तुमचा आतला आवाज काय सांगतो, याकडे विद्यार्थी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांनी आधी स्वत:ला नीट ओळखणे आवश्यक आहे. ‘स्व’ची नीट ओळख झाल्यानंतर करिअरची निवड करा. काही वेळेस अपयश येते; परंतु खचून न जाता यश मिळविण्यासाठी सकारात्मक विचार कायम मनाशी बाळगून सातत्याने अभ्यास सुरू ठेवा.मार्गदर्शन करताना शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञानचे विभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉर्इंट येत असतो. तो ओळखून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. ज्या क्षेत्रात करिअर करावयाचे आहे, ते ध्येय निश्चित करून त्याचा पाया पक्का करा. परदेशात शिक्षणाच्या व संशोधनांच्या अनेक संधी आहेत. त्यात आपल्याला स्वत:ला उत्तम इंग्रजी येणे आवश्यक आहे.

याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. जयदीप बागी यांनी ‘परदेशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरच्या वाटा’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच कॅशस्ट्रोल इंडिया मुंबईचे वाणिज्य व्यवस्थापक गौरव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एज्युकेशन गुरूचे कुणाल पाटील म्हणाले, भविष्यातील संधीचा विचार करून अभ्यासक्रम निवडावा. आॅस्ट्रेलिया, कॅनडा, आदी परदेशांतील शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगितली.शीतल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल पाटील यांनी आभार मानले. यावेळी निवृत्त प्राध्यापक डॉ. अरुण भोसले, शिवाजी विद्यापीठाचे सेवानिवृत्त वित्त व लेखा अधिकारी डॉ. बी. एस. पाटील, गौरव सावंत, डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यशाळेत मिळाला दृष्टिक्षेप

  • - भविष्यातील संधी
  • - संधीची उपलब्धता
  • - स्पर्धात्मक युगात वावरण्याचा मंत्र
  • - यशस्वी मुलाखतीचे तंत्र 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन