शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण, राजापुरात पाणीच पाणी

By admin | Updated: July 13, 2016 00:50 IST

पावसाचा कहर : विश्रांती घेतलेल्या पावसाचा पुन्हा जोरदार तडाखा

ओसरलेले पाणी पुन्हा बाजारपेठेत! चिपळुणात पूरसदृश स्थिती कायमराजापूर : रविवारी तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने तालुक्यातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत होते. राजापूर शहर बाजारपेठेत आलेला पूर रविवारी रात्री ओसरला. मात्र, पावसाने जोर वाढवल्याने सोमवारी दुपारी पुराचे पाणी शहरातील बाजारपेठेत पुन्हा शिरले.सोमवारी सकाळी समस्त व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडून साफसफाई केली. अनेक दुकानात पुराचे पाणी भरल्याने गाळ दुकानात साचला होता तो साफ करण्यात आला. सोमवारपासून नियमित व्यवहार सुरु झाले. सकाळपासून जवाहर चौकाकडे येणारी वाहतूक सुरु झाली होती .पावसामुळे तालुक्यात फारसे नुकसान झाल्याची नोंद नसली तरी महावितरणाला याचा चांगलाच फटका बसला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून तालुक्यातील काही भागातील वीज गायब झाली आहे. सकाळनंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे दुपारच्या सुमारास राजापूर बाजारपेठेत पुन्हा अर्जुना नदीचे पाणी शिरले आणि व्यापाऱ्यांची पुन्हा पळापळ झाली. सलग दुसऱ्या दिवशी पुराचे पाणी शहरात भरल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत कोठेही नुकसान झाल्याची नोंद नव्हती. मात्र पुराचे पाणी वाढतच होते. (प्रतिनिधी)चिपळूण : शहर व परिसरात रविवारी दिवसभर संततधार पाऊस पडल्याने वाशिष्ठी व शीव नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालयांना व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शंकरवाडी ते बाजारपूल, खाटीकआळी, शिवाजी चौक, भैरी मंदिर, वडनाका हा परिसर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पाण्याखाली होता. पेठमाप, गोवळकोट भागातही काही ठिकाणी पाणी भरले होते. सकाळी ११ नंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. पाऊस थांबला असला तरी पूर परिस्थिती कायम आहे. शीव व वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी ५ मीटरपर्यंत गेली आहे. शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मच्छीमार्केट, नाईक कंपनी, भेंडीनाका, मंडईचा मागील भाग, शिवाजी चौक, वडनाका ते मार्कंडी दरम्यानच्या भागात पाणी होते. शीवनदी येथील झोपडपट्टी, रंगोबा साबळे रोड या मार्गावरही पुराचे पाणी आले आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बाजारपूल पहाटे पाण्याखाली गेला होता. मात्र, सकाळी पाऊस थांबल्यामुळे झपाट्याने पाणी खाली उतरले. दिवसभर अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. खेर्डी परिसरात गटारे व नाले तुंबल्याने शिगवणवाडी येथे पाणी रस्त्यावर आले आहे. चिपळुणात १६६.२२ मिलिमीटर, तर १ जूनपासून आज सोमवारपर्यंत १७००.७४ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. नगर परिषदेतर्फे नागरिकांना सावध राहण्यासाठी सकाळी ३ भोंगे वाजविण्यात आले. महर्षी अण्णासाहेब कर्वे मंडईबाहेरही पाणी साचले होते. बाजारपेठेतील भेंडीनाका, मच्छीमार्केट परिसरात पाणी असल्याने सकाळच्या सत्रातील गुहागर मार्गावर जाणाऱ्या एस. टी.च्या गाड्या गुहागर बायपासमार्गे वळविण्यात आल्या होत्या. पावसामुळे धामणवणे येथील संतोष धोंडू पिटले यांच्या घराचे ३० हजार २० रुपयांचे नुकसान झाले. खेर्डीच्या मंडल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आकले येथे सुभाष गणपत निकम यांच्या घराचे, तर कादवड येथे संतोष शांताराम शिंदे यांच्या घराचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त कोठेही मोठे नुकसान झाल्याची नोंद नाही. भातशेतीत पाणी शिरल्यामुळे शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. काढलेली भाताची रोपे वाहून गेली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्क झाली आहे. तहसीलदार जीवन देसाई व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शहरात ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बाजारपुलाजवळ बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)