शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

चिपरीत नऊ वर्षांपासून मोफत आरोग्य सेवेचा वसा- जीवनदीप आरोग्य सेवा संस्था : रणजित आवळे, विजय कांबळे या दोन तरुणांचा प्रेरणादायी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:28 IST

उदगाव : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने जयसिंगपूर येथे उपचारासाठी जाणे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही.

संतोष बामणे ।उदगाव : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने जयसिंगपूर येथे उपचारासाठी जाणे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे एक पाऊल पुढे येऊन रणजित आवळे व विजय कांबळे या दोन युवकांनी जीवनदीप आरोग्य सेवा संस्थेची स्थापना करून ते गेल्या नऊ वर्षांपासून चिपरीच्या नागरिकांना मोफत आरोग्य सेवा व औषधे देत आहेत. ग्रामीण भागात ही संस्था चिपरीकरांना आधारवड बनली आहे.

सध्या होत असलेल्या आजारांमुळे अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. आर्थिक अडचणींमुळे रुग्ण दगावतात. याचा अनुभव घेऊन रणजित आवळे व विजय कांबळे यांनी २००८ साली जीवनदीप आरोग्य सेवा संस्थेची स्थापना केली. चिपरी येथील बस थांब्याजवळच मोफत दवाखाना केंद्र आहे. नागरिकांना चांगली व विनामूल्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी या संस्थेत रुग्णांची ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी, गुडघेदुखी आजारांची तपासणी करून औषधे दिली जातात. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी हे चार दिवस दवाखान्याची सोय आहे.

डॉ. सुरेश पाटील (जयसिंगपूर), डॉ. मिलिंद कोलप (डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज), डॉ. मिलिंद सांवत (मिरज) यांच्याकडून रुग्णांची तपासणी केली जाते. आठवड्यात १५० हून अधिक रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेतात. तर याच संस्थेकडून शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा व करवीर तालुक्यांत आरोग्य सेवकांद्वारे काम सुरू आहे.मार्गदर्शन व विविध सेवारक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, डोळे तपासणी, वृक्षारोपण, सामाजिक प्रबोधन याबरोबरच एच.आय.व्ही. व क्षयरोगांवर मार्गदर्शन केंद्रांतून सेवा दिल्या जातात. गरजूंना मोफत रक्तपुरवठाही केला जातो. मणक्याचे संसर्ग, कॅन्सर, हृदयरोग, मेंदू यांसह विविध आजारांच्या चिपरीतील रुग्णांना मोफत व शासकीय लाभातून सेवा देण्याचे काम ही संस्था करते.माणसांच्या जिवासाठी प्रयत्ननागरिकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन माणसांच्या जिवासाठी काहीतरी चांगले करावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. लवकरच दहा बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. तो सामाजिक कार्यातून लवकरच पूर्ण करणार असल्याचे रणजित आवळे व विजय कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.