पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा रेडेकरा यांचे चुलत भाऊ आपल्या कुटुंबासह वडाचे माळ नावाच्या शेतावर राहण्यास आहेत. दरम्यान, बुधवारी त्यांच्या शेतात काजू वेचत असताना साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास शेतातून आरडाओरडा ऐकू आला. बाहेर जाऊन पाहिले असता प्रकाश रेडेकर यांची मुलगी अर्पिता ही रस्त्याच्या पलीकडे पोरेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या शेततळ्यामध्ये पडली असल्याचे समजले. गावातील लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले असता ती बेशुद्ध होती. त्यानंतर तिला प्राथमिक उपचारांकरिता ग्रामीण रुग्णालय, चंदगड येथे नेण्यात आले असता डॉक्टरानी तपासून ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.
फोटो ओळी : मृत अर्पिता रेडेकर