शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लर पार्टीच्या कार्यक्रमात माणुसकी भारावली, धनाजी जगदाळे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:35 IST

गावी जाण्यासाठी केवळ सात रुपयांची गरज असताना, सापडलेली चाळीस हजार रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या धनाजी जगदाळे यांचा चिल्लर पार्टीने केलेल्या सत्काराने माणुसकी भारावून गेली.

ठळक मुद्देलाखोंची संपत्ती नाकारणाऱ्या धनाजी जगदाळे यांचा सत्कार डम्बो सिनेमाला मुलांचा भरभरून प्रतिसाद

कोल्हापूर : गावी जाण्यासाठी केवळ सात रुपयांची गरज असताना, सापडलेली चाळीस हजार रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या धनाजी जगदाळे यांचा चिल्लर पार्टीने केलेल्या सत्काराने माणुसकी भारावून गेली.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवारी शाहू स्मारक येथील कार्यक्रमात अभिनेते सागर तळाशीकर यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील पिंगळी बुद्रुक या गावातील धनाजी जगदाळे या शेतमजुराचा रोख रक्कम, पेहराव आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी मुलांसाठी ‘डम्बो’ हा सिनेमा दाखविण्यात आला.यावेळी सागर तळाशीकर म्हणाले, अशा धनाने नाही तर मनाने श्रीमंत असलेल्या माणसांमुळेच समाज जिवंत आहे. माणसाला मोहापासून सुटका करून घेणे अवघड असते; पण धनाजी जगदाळेंसारख्या माणसांमुळेच समाज घडत असतो. त्यांचा हा प्रामाणिकपणाच मुलांसाठी आदर्श ठरेल.माझ्यासारख्याच गरीब माणसाची मी केवळ मदत केली, अशी भावना यावेळी धनाजी जगदाळे यांनी व्यक्त केली. मुलांनी प्रामाणिकपणा जपावा, असे आवाहन करून त्यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पिंगुळी गावचे सूर्यकांत जगदाळे, संभाजी कोकरे, महेंद सजगणे, किसन जाधव, सायबर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दीपक भोसले, आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात चिल्लर पार्टीच्या वतीने सागर तळाशीकर, पिंगुळी गावचे प्रा. राजेंद्र जगदाळे यांना सिनेमा पोरांचा हे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी चिल्लर पार्टीचे अतुल मजेठिया, राजू नाईक, गुलाबराव देशमुख, अभय बकरे, रवींद्र शिंदे, निलोफर महालकरी, घन:शाम शिंदे, रोहित कांबळे उपस्थित होते.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर