कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या हस्ते बुधवारी येथे करण्यात आले.महानगरपालिकेच्या मामा भोसले विद्यामंदीर येथे महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत भिरभिरं फिरवणाऱ्या मुलीचे छायाचित्र असलेल्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे यावेळी अनावरण झाले.१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी सलग दोन दिवस शाहू स्मारक भवनात रंगणाºया या महोत्सवात सहा जागतिक चित्रपट मोफत दाखविले जाणार आहेत.
चिल्लर पार्टीच्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 19:46 IST
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या हस्ते बुधवारी येथे करण्यात आले.
चिल्लर पार्टीच्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण
ठळक मुद्देचिल्लर पार्टीच्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरणचिल्लर पार्टी कौतुकास पात्र : प्रशासन अधिकारी यादव