शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

जादूच्या नगरीत बालचमूंची सफर

By admin | Updated: September 5, 2016 00:33 IST

जितेंद्र रघुवीर यांचा प्रयोग : ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने विशेष शोचे आयोजन

कोल्हापूर : ‘गिली-गिली छू...’ असे म्हणत प्रेक्षकांतील मुलीला स्टेजवर हवेत तरंगविणे, मानेतून तलवार आरपार घालणे, शून्यातून विश्वनिर्मिती अशा नवनवीन चमत्कारी जादूच्या प्रयोगांनी जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी बालचमूंनाच नव्हे, तर पालकांनाही आपल्या मायाजालात तब्बल दीड तास खिळवून ठेवले. निमित्त होते, ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने आयोजित विशेष मॅजिक शोचे. शनिवारी (दि. ३) केशवराव भोसले नाट्यगृह येथे जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या विशेष दोन शोंचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांच्या तिसऱ्या पिढीतील जितेंद्र यांनी शनिवारी १५ हजार २९ वा जादूचा प्रयोग पार पडला. जादूचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रयोग पाहण्याची पर्वणी बाल विकास मंच सदस्यांना मिळणार असल्याने ‘लोकमत बाल विकास मंच’ सदस्यांनी दुपारी दोन वाजल्यापासूनच केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर गर्दी केली होती. अवघ्या काही मिनिटांतच सभागृह हाऊसफुल्ल झाले. स्टेजवरील पडदा उघडताच बाल विकास मंच सदस्यांनी एकच जल्लोष करून जादूगार जितेंद्र यांचे स्वागत केले. जितेंद्र रघुवीर यांनीही स्पेशल लाईट इफेक्टच्या माध्यमातून दमदार एंट्री करून उपस्थित बाल विकास मंच सदस्यांना प्रारंभीच तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. भारत खराटे व जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेष शोचे प्रायोजक चाटे शिक्षण समूह हे होते. त्यानंतर जादूगार जितेंद्र यांनी आपल्या जादूच्या प्रयोगास सुरुवात केली. झेंग-झॅगबॉय, भूतनी बॉक्स, डबल एक्स्चेंज मिस्ट्री, रुबिक्स क्यूब गेम शो, मास्टर आॅफ प्रेडिक्शन, एकाच बॉक्समधून अनेक वस्तू, शून्यातून विश्वाची निर्मिती, अरेबिक जादू, पत्त्यांचे प्रयोग अशा देशी व विदेशी जादूंचे प्रयोग सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फे डत अनेकांना आश्चर्याचा धक्काही दिला. गिलोटोन हा जिवंत माणसाचा मान कापणारा खेळ पाहून लहानांसोबत पालकांचा थरकाप उडाला. टेबलावर माणसाचे दोन तुकडे करणे या प्रयोगाने तर बच्चे कंपनीला अक्षरश: खिळवून ठेवले. एकाच बॉक्समधून अनेक वस्तू काढणे, जाड पत्र्यामधून माणूस आरपार करणे, फुलांचा रंग बदलणे, मासिकातून पाणी काढणे या प्रयोगांना बालचमूने भरभरून दाद दिली. लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच जादूच्या प्रयोगाबद्दल आकर्षण असते. त्यामुळे आमची तिसरी पिढी जादूचे प्रयोग करीत आहे. वेगवेगळे प्रयोग करणे, लोकांना सतत काहीतरी नवीन दिल्यामुळेच लोकांनी आम्हाला इतके भरभरून प्रेम दिले आहे. - जादूगार जितेंद्र रघुवीर मुलांच्या निखळ मनोरंजनासह मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारे ‘लोकमत बाल विकास मंच’ हे एक व्यासपीठ आहे. त्यामुळे ‘लोकमत’च्या अशा उपक्रमास मी सदैव पाठीशी राहीन. - प्रा. भारत खराटे, संचालक , चाटे शिक्षण समूह तिसरी पिढी.... आपल्या जादूच्या प्रयोगाने सर्वांना भुरळ घालणारे जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांच्या मुलगा जादूगार विजयनंतर आता नातू जादूगार जितेंद्र यांनी आपल्या घरचा वारसा जपला आहे. जितेंद्र हेसुद्धा उच्चशिक्षित असून, जादूबद्दलचे जनमानसातील असणारे गैरसमज दूर करीत ते लोकांचे निखळ मनोरंजन करीत आहेत. या कुटुंबीयांचा तब्बल १५ हजार २९ वा प्रयोग शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला.