शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मुलांची धूमस्टाईल; पालकांवर गुन्हा

By admin | Updated: April 30, 2017 01:20 IST

विश्वास नांगरे-पाटील : मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविणार; परिक्षेत्रात ५० हजार ३७९ वाहनांवर कारवाई

कोल्हापूर : अज्ञान मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे त्यांच्यासह पादचाऱ्यांच्या जिवालाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना सापडल्यास दंड होईलच; त्याशिवाय त्यांच्याकडून झालेल्या अपघातात कुणाचा मृत्यू झाल्यास पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी दिली. परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्णांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० हजार ३७९ वाहनांवर कारवाई करून १ कोटी १० लाख ३१ हजार १२० रुपये दंड वसूल केला. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिस प्रशासनाने सोमवार दि. १७ ते १८ व सोमवार दि. २४ व २५ एप्रिल हे चार दिवस ही मोहीम राबवली आहे.यावेळी विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, वाहनांची संख्या वाढल्याने पाचही जिल्ह्णांतील शहरासह इतर पर्यटनस्थळी वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्णपणे वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या तीन वर्षांत अपघाती मृतांची संख्या जास्त आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी परिक्षेत्रातील पाच जिल्ह्णांत बेफिकीर वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दि. १७ ते १८ व २४ ते २५ एप्रिल या चार दिवसांत पोलिस रस्त्यावर उतरले. प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहने तपासली. यावेळी परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्ण वाहनचालकांना जाग्यावर २०० ते ५०० रुपये दंडाची पावती दिली गेली. बहुतांश पाच जिल्ह्णांमध्ये सर्वाधिक कारवाई वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) नसणाऱ्यांवर झाली. ही कारवाई येथून पुढे आठवड्यातील कोणतेही दोन दिवस निवडून केली जाणार आहे. परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्णांत वाहनांची रहदारी वाढल्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग नसतानाही वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. त्यामुळे वाहनधारकाला समोरच्या वाहनाला ओलांडून जाताना अपघाताला सामोरे जावे लागते. वाहन चालविताना मोबाईलवर बोलत जाणे ह ‘स्टाईल’च बनली आहे. त्याचा परिणाम म्हणून अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. अज्ञान मुलांच्या हातात दुचाकी दिल्याने अनेक पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. मुलांनी केलेल्या अपघातातील मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या त्यांच््या पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. चालकांची तपासणी पुणे-बंगलोर महामार्गावर ट्रकचालक मद्यपान, नशिल्या पदार्थांचे सेवन करून वाहने चालवीत असतात. त्यामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करून प्रत्येक वाहनचालकाची ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे.जिल्हा खटलेदंड कोल्हापूर१२०३१२४४८०००सांगली८५१५१७२४१००सातारा७०३११५९५६००सोलापूर ग्रामीण९२०४१६१२९२०पुणे ग्रामीण१३५९८३६५०५००