ते पी. एन. पाटील फाउंडेशनच्यावतीने करवीर तालुक्यातील पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार व सन्मानचिन्ह प्रदानप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. के. शानेदिवाण होते. यावेळी तालुक्यातील आदर्श शिक्षकांनाही गौरवण्यात आले. संयोजन धनाजी पाटील, जे. डी. कांबळे, प्रा. निवास कुंभार यांनी केले. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. ए. डी. चौगले यांनी केले.
यावेळी कृष्णराव किरुळकर, जि. प. सदस्य राहुल पी. पाटील, भोगावती कारखान्याचे व्हा. चेअरमन उदयसिंह पाटील, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, उपसभापती सुनील पोवार, राधानगरीचे उपसभापती उत्तम पाटील, गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव, गोकुळ संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, हिंदुराव चौगले, धीरज डोंगळे उपस्थित होते.
फोटो ओळी : पी. एन. पाटील फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करताना आमदार पी. एन. पाटील, उदयसिंह पाटील-कौलवकर, बी. ए. पाटील, प्राचार्य शानेदिवान, बाळासाहेब खाडे उपस्थित होते.