शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी साधणार कोल्हापूरकरांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:37 IST

देशप्रेम, त्याग आणि निष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या शहीद भगतसिंग, राजगुरूआणि सुखदेव या क्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी (दि. २ एप्रिल) कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत. त्यामध्ये भगतसिंग यांचे पुतणे अभयसिंग, राजगुरूयांचे नातू सत्यशील राजगुरू, सुखदेव यांचे नातू आनुज थापर यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देक्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी साधणार कोल्हापूरकरांशी संवादअभयसिंग, सत्यशील राजगुरू, आनुज येणार; खासबाग मैदानात कार्यक्रम

कोल्हापूर : देशप्रेम, त्याग आणि निष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या शहीद भगतसिंग, राजगुरूआणि सुखदेव या क्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी (दि. २ एप्रिल) कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत. त्यामध्ये भगतसिंग यांचे पुतणे अभयसिंग, राजगुरूयांचे नातू सत्यशील राजगुरू, सुखदेव यांचे नातू आनुज थापर यांचा समावेश आहे.‘क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांशी संवाद’ हा कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे, अशी माहिती भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे आणि संयोजन समितीचे जितेंद्र बामणे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.राहुल चिकोडे म्हणाले, शहीद दिनानिमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, साथी फौंडेशन, वूई कॅन फौंडेशन आणि मराठा रणरागिणी या संस्थांतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने क्रांतिकारकांचे हे वंशज पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमात शहीदांवरील चित्रफीत दाखविण्यात येईल.

देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. जितेंद्र बामणे म्हणाले, क्रांतिकारकांच्या वंशज हे सोमवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता ताराराणी चौकात येतील. तेथून त्यांना रॅलीने शहरात आणण्यात येईल. मंगळवारी (दि. २) सकाळी अंबाबाई मंदिर, मोतीबाग तालीम, न्यू पॅलेसला ते भेट देतील.

सायंकाळी खासबाग मैदानातील कार्यक्रमाला उपस्थित राहतील. बुधवारी (दि. ३) सकाळी कणेरी येथील सिद्धगिरी मठाला भेट देऊन दुपारी ते पुण्याला रवाना होतील. या पत्रकार परिषदेस पारस ओसवाल, निखिल शिंदे, सीमा पाटील, मनीषा जाधव, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर