शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रा तिसऱ्यांदा भरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:01 IST

रवींद्र येसादे।लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : १९९७ मध्ये आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथे बांधण्यात आलेला चिकोत्रा पाटबंधारे प्रकल्प तिसºयांदा भरण्याची शक्यता असून, चिकोत्राने नव्वदीचा टप्पा पार केला आहे. धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने प्रकल्पातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने केले आहे.म्हातारीच्या पठारावरून येणारे पाणी व १५ जूनपासून सतत पडणाºया पावसामुळे पाणीसाठ्यात दिवसागणिक वाढ ...

रवींद्र येसादे।लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : १९९७ मध्ये आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथे बांधण्यात आलेला चिकोत्रा पाटबंधारे प्रकल्प तिसºयांदा भरण्याची शक्यता असून, चिकोत्राने नव्वदीचा टप्पा पार केला आहे. धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने प्रकल्पातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने केले आहे.म्हातारीच्या पठारावरून येणारे पाणी व १५ जूनपासून सतत पडणाºया पावसामुळे पाणीसाठ्यात दिवसागणिक वाढ होत आहे. सन २००५, २००७ यावेळी प्रकल्प भरल्याने सांडव्यातून पाणी सोडण्यात आले. २००७ नंतर यंदा प्रकल्प भरण्याच्या तयारीत आहे. सततच्या पावसामुळे म्हातारीच्या पठारावरून मोठ्या प्रमाणात चिकोत्राकडे पाणी येतआहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तब्बल दहा वर्षांनंतर चिकोत्रामध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा होत असल्याने बुडीत व लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे. आता दरबर्षी पाणीसाठा ४५ टक्क्यांपर्यंत होत होता. मात्र, यंदा प्रकल्प नव्वदी पार करेल अंदा अंदाज बांधला जात आहे.दहा वर्षांनी दरवाजांची डागडुजीप्रकल्प पूर्ण भरण्यासाठी दरवाजाजवळ पाणी येण्यासाठी सात फूट कमी आहे. सध्या ६५०.४०. द.ल.घ.फूट पाणी आहे. पाण्याचा प्रवाह प्रकल्पात वाढला असल्याने प्रकल्प भरणार आहे.पाणी कोठून सोडायचे याबाबत विचार सुरू आहे. दरवाजांची डागडुजी केली आहे. मुख्य गेट किंवा दरवाजामधून पाणी सोडण्यात येणार आहे. मुख्य गेटमधून पाणी सोडल्यास वीज निर्मिती होणार आहे.चार कर्मचारी...पण हजर दोनच...!प्रकल्पाच्या देखभालीसाठी चार कर्मचाºयांची पाटबंधारे विभागाने नियुक्ती केली आहे. त्यापैकी दोघे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने रजेवर आहेत. त्यामुळे प्रकल्पाची देखभाल दोघांच्यावरच आहे.प्रकल्पावर वाहनांना बंदीसुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रकल्पावर नेहमी ये-जा करणारी वाहने प्रकल्पावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रवेशद्वारावरच अडविण्यात आली आहेत. प्रकल्प भरत असल्याने कापशी खोºयातील पर्यटकांची गर्दी होत आहे.