शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रा खोऱ्यात सोयीच्या आघाड्या

By admin | Updated: July 19, 2015 23:42 IST

अकरा ग्रामपंचायती : कासारीत मंडलिक-मुश्रीफ युती, अनेक ठिकाणी अपक्ष रिंगणात

सेनापती कापशी : राजकीयदृष्ट्या लक्षवेधी व संवेदनशील असणाऱ्या चिकोत्रा खोऱ्यातील अकरा ग्रामपंचायतींकरिता येत्या २५ तारखेला मतदान होत आहे. तालुका व जिल्हा पातळीवरील प्रमुख नेत्यांनी केलेल्या राजकीय तडजोडी पाहता स्थानिक पातळीवरही सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. गावची ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सर्वांनी आक्रमक प्रसारास सुरुवात केल्यामुळे कागल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्यात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे.वडगाव येथे ९ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. संजय घाटगे-मंडलिक-राजे यांनी आघाडी केली असून, मुश्रीफ गटाने आठ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. चार उमेदवार अपक्ष आहेत. प्रमोद बाबूराव सुतार हे बिनविरोध निवडून आले आहेत. याठिकाणी नेताजी मोरे, एकनाथ नार्वेकर, रवी देवठाणेकर, रतन कांबळे, विठू दिवटणकर यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.माद्याळ येथे लक्षवेधी निवडणूक होत आहे. संजय घाटगे-मंडलिक-मुंबईकर ग्रुप विरुद्ध मुश्रीफ-राजे गटात याठिकाणी लढत होत आहे. अकरा जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. तीन उमेदवार अपक्ष आहेत. सरपंच सूर्याजीराव घोरपडे, माजी जि. प.चे उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे, अमरसिंह घोरपडे (संचालक शाहू साखर), मारुतीराव चोथे व ढोणुसे ग्रुप आपापल्या गटाचे नेतृत्व करत आहेत.कासारीमध्ये मंडलिक-मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे गट यांच्यात लढत होत असून राजे गटाने चार जागावर आपले उमेदवार उभे केले आहेत. ९ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी राजू राजिगरे, एम. एस. पाटील, मधुकर नाईक, तानाजी पाटील, भरत पाटील, राजू कांबळे, सचिन सुतार, धनाजी काटे, शिवाजी इंगवले, दयानंद पाटील, अशोक कुरणे, आदी स्थानिक नेते आपल्या गटाची धुरा सांभाळत आहेत.हसूर खुर्द येथे मंडलिक गटात फूट पडली असून पुंडलिक पाटील यांनी मुश्रीफ-राजे गटाबरोबर, तर एकनाथ पाटील यांनी संजय घाटगे गटाबरोबर युती केली आहे. ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे याठिकाणी सरळ लढत होत आहे. माजी सरपंच अंकुश पाटील, डी. व्ही. पाटील, सुभाष गडकरी, एकनाथ पाटील आपापल्या गटाचे नेतृत्व करीत आहेत.मांगनूरमध्ये ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात असून मुश्रीफ-राजे-शिवसेना विरुद्ध संजय घाटगे-मंडलिक अशी युती अस्तित्वात आली आहे. भावेश्वरी परिवर्तन आघाडीचे नेतृत्व धनाजी तोरस्कर, महादेव फराकटे, रणजित पाटील, संजय जाधव आदी करत आहेत, तर विरोधी आघाडीचे नेतृत्व शामराव पाटील, आप्पासाहेब तांबेकर, बाबूराव भांदिगरे करत आहेत.आलाबादमध्ये संजय घाटगे-मंडलिक विरुद्ध मुश्रीफ गट अशी सरळ लढत आहे. ९ जागांसाठी १८ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. माजी सरपंच जे. डी. मुसळे, संतोष खराडे, एकनाथ कामते, महंमदपाशा देसाई, आदी प्रचारात सक्रिय आहेत. तमनाकवाडा सरपंचपद खुले असल्यामुळे लढत चुरशीने होेत आहे. मुश्रीफ-शिवसेना-रणजित पाटील विरुद्ध राजे-मंडलिक-संजय घाटगे-शिवसेना अशी युती अस्तित्वात आहे. दगडू चौगले, जयवंत तिखे, भिकाजी निवळे, दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय चौगले आदी प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. (वार्ताहर)मासा बेलेवाडीचा आदर्शमासा बेलेवाडी गावाने ग्रामपंचायत बिनविरोध करून पायी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे, तर बेनिक्रेत ९ जागांसाठी ४९ उमेदवारांनी अर्ज भरले, पण अर्ज माघारीदिवशी नाट्यपूर्ण घडामोडी होऊन ४० जणांनी अर्ज माघार घेतल्यामुळे येथील निवडणूकही बिनविरोध झाली. एकूणच गावागावांतील राजकीय वातावरण तापू लागले असून मतदाराला थेट घरात जाऊन भेटण्यावर भर दिला जात आहे.