शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेच्या कामात मुख्याधिकाऱ्यांनी सक्रीय व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 16:59 IST

Chiefs, work of nationwide, economic census, collcator, kolhapur सातवी आर्थिक गणनेच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: नागरी भागातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी सक्रीय होवून सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

ठळक मुद्देराष्ट्रव्यापी आर्थिक गणनेच्या कामात मुख्याधिकाऱ्यांनी सक्रीय व्हावेजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले निर्देश

कोल्हापूर : सातवी आर्थिक गणना ही देशाच्या/राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेतील मोठ्या क्षेत्राच्या संरचनेबाबत माहिती मिळविण्याचे महत्वाचे स्त्रोत ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: नागरी भागातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी या कामात सक्रीय होवून सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात सातव्या राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. जिल्हा सांख्यिकी अधिकारी तथा सदस्य सचिव सायली देवस्थळी यांनी सुरुवातील सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे प्रलंबित असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक गणनेचे काम पूर्ण करावे. ज्या नागरी क्षेत्रात अजूनही काम झाले नाही अशा नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी सक्रीय सहकार्य करावे. त्याबाबत त्यांच्याशी पत्र व्यवहार करावा. प्रगणकाकडून होणारे आर्थिक गणनेच्या कामाचे पर्यवेक्षण पर्यवेक्षकाने करावे. महिना अखेरपर्यंत उर्वरित २६७ ग्रामपंचायतींचे काम पूर्ण करावे.बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, पोलीस उप अधीक्षक पी.एस.कदम, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणचे व्ही.जी. भागवत, जीवन शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरEconomyअर्थव्यवस्था