शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाही अजून हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:58 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लघु दाब, उच्च दाब वितरणप्रणाली व त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लघु दाब, उच्च दाब वितरणप्रणाली व त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा धडाका महावितरणने लावला खरा, परंतु या योजनेतून प्रत्यक्षात कनेक्शन मिळताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. सौरकृषी पंप योजनेतून नुसते अर्ज भरून घेण्यात आले असून, अजून एकही कनेक्शन या योजनेतून सुरूझाले नसल्याचे कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातील चित्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यात नदीत पाणी आहे; परंतु ते कृषिपंप नसल्याने पिकाला देता येत नसल्याचे चित्र आहे. ३१ मार्च २०१८ अखेर कोल्हापूर जिल्ह्यात ८४४२, तर सांगली जिल्ह्यात १६४१७ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. हे पैसे २०१४ पासून भरले आहेत; परंतु शेतकºयांना कनेक्शन मिळालेले नाही. शेतकºयांनी पैसे भरूनही त्यांना वीज कनेक्शन देता येत नाही म्हणून महावितरण कंपनीने गाजावाजा करून उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) तातडीने कनेक्शन देणार, असे जाहीर केले.मार्च २०१८ चा बेस धरून ज्या शेतकºयांनी पैसे भरले आहेत, परंतु त्यांना कनेक्शन देता आलेले नाही, अशांना जुन्याच पारंपरिक योजनेतून म्हणजे लघुदाब वाहिनींवरून कनेक्शन देण्यात आलीत.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात जे पैसे भरून प्रतीक्षा यादीत शेतकरी होते, त्यांच्यासाठी उच्चदाब वाहिनीतून तातडीने कनेक्शन देणार, असे जाहीर केले; त्यासाठी १०,१६ आणि २५ केव्हीए क्षमतेचे व्यक्तिगत डीपी बसवून देण्यात येणार होते; परंतु त्यासाठी नवीन रोहित्रे उपलब्ध झाली नाहीत आणि खासगी निविदेला मार्जिन कमी असल्याच्या कारणावरून ठेकेदारांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही; त्यामुळे या दोन जिल्ह्यात जे २४८५९ प्रलंबित कनेक्शन्स होती, त्यातील उच्चदाब प्रणालीतून फक्त ३१६ कनेक्शन्स देण्यात आली आहेत.विधिमंडळातील आश्वासनालाही हरताळपश्चिम महाराष्ट्रातील पेड पेंडिंग वीज कनेक्शन्सचा विषय आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारने ही कनेक्शन्स मार्च २०१९ पर्यंत देण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते; परंतु प्रत्यक्षात त्या आश्वासनालाही हरताळ फासला गेला आहे.पैसे भरून कनेक्शन न मिळालेली शेतकरी(१५ एप्रिल २०१९ अखेर)कोल्हापूर : ५०६०सांगली : १०७२५उच्चदाब प्रणालीतील कनेक्शन्सकोल्हापूर : १२९सांगली : १८७दोन्ही जिल्ह्यातील प्रोसेसमध्ये असलेली प्रकरणे : ६००कोल्हापूर सांगलीअर्ज प्राप्त २३४८ १२६१अर्ज बाद १४१४ ७८३कोटेशन दिले ३५० १०५कोटेशन भरून घेतले २०५ ७२वर्क आॅर्डर : १९२ ७०प्रत्यक्षात कनेक्शन : एकही नाहीयुती सरकारमधील मंत्र्यांच्या मनांत पश्चिम महाराष्ट्राबद्दल आकस असल्यानेच या भागातील शेतकºयांच्या वीज कनेक्शन्सबद्दल सरकार काहीच करायला तयार नसल्याचा अनुभव आम्ही चार वर्षे घेत आहोत. शेतकºयांचे शिष्टमंडळ घेऊन दोन दिवसांत मुख्य अभियंत्यांना जाब विचारणार आहोत.- विक्रांत पाटील- किणीकर, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन