शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मुख्यमंत्री हे थापाडे, बोलघेवडे

By admin | Updated: October 29, 2015 00:47 IST

नारायण राणे यांची सडकून टीका : भाजपकडून जनतेची घोर फसवणूक

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थापाडे, बोलघेवडे, बालीश व बेजबाबदार वक्तव्य करणारे असून, त्यांनी वर्षभरात राज्याच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. फक्त जाहिरातबाजी, पत्रकबाजी करून जनतेला फसविले आहे, अशी प्रखर टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कोल्हापुरात आले होते. शिवाजी विद्यापीठ मार्गावर माऊली पुतळ्यानजीक आयोजित सभेत ते बोलत होते. त्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेताना गेले वर्षभर तरी ‘अच्छे दिन’ दिसले नसल्याचे कोल्हापूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याची आवश्यकता होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही बेजबाबदारपणाची वक्तव्ये केली नव्हती; पण फडणवीस यांनी काल (मंगळवारी) झालेल्या प्रचारात वैचारिक पातळीच शिल्लक ठेवली नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या ५० वर्षांच्या सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांना फडणवीस यांनी बेईमान म्हणणे हे मुख्यमंत्र्यांना शोभा देणारे नाही. त्यांची सत्ता येऊन वर्ष झाले तरीही जनतेला काही ‘अच्छे दिन’ दिसले नाहीत. केंद्रातून राज्याच्या विकासासाठी निधी आणतो म्हणून जनतेला हे फडणवीस फसवत आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या पदरी नेहमीच निराशा टाकली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेल्या जाहीरनाम्यात शाहू, शिवाजी महाराजांचा त्यांना विसर पडला आहे. जाहीरनाम्यात ‘सब कुछ मोदी’ असे फोटोवरून दिसते. हा फसविण्याचा धंदा लोकसभा-विधानसभेसाठी पचला पण महापालिका निवडणुकीत शाहूंच्या नगरीत आता पचणार नाही, अशीही टीकाही त्यांनी केली. कोल्हापूरला ‘स्मार्ट सिटी’ देऊ, असे सांगणारे मुख्यमंत्री त्यासाठी पैसे कसे व कुठून देणार याबाबत मात्र मौन पाळत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेवरही तसेच कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही टीकेची झोड उठविले. माजी मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरला विकासगंगा काँग्रेस सरकारने आणल्याचे सांगितले तर यावेळी डॉ. पतंगराव कदम यांनीही काँग्रेसच्या विचारधारेने गेल्यास विकास दूर नसल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सत्यजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.फडणवीसांचे पानसरेंंबाबत मौन का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात आले असताना ते ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या घरी का गेले नाहीत? की त्याबद्दल त्यांनी एकही ‘शब्द’ काढलेला नाही. त्यांनी या प्रकरणाची जात-पात-धर्म न पाहता नि:पक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे आहे, असेही राणे म्हणाले.तीर्थक्षेत्र विकासात ‘अंबाबाई’चे नाव का नाही?केंद्राने महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली; पण त्यामध्ये अंबाबाईचे का नाव नाही. अमरावती, विदर्भातील तीर्थक्षेत्रांची नावे कशी मुख्यमंत्र्यांनी घुसडली. त्यामळे अशा दुतोंडी मुख्यमंत्र्यांचे फक्त बोलघेवडे प्रेम कोल्हापूरवर असल्याचे राणे म्हणाले.