शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

न्यू पॅलेसवर मुख्यमंत्र्यांचा सत्कार

By admin | Updated: June 27, 2016 01:14 IST

रविवारी मुख्यमंत्र्यांनीही या ठिकाणी भेट दिली. त्यामुळे या भेटीला वेगळे महत्त्व आले होेते; परंतु यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी न्यू पॅलेस येथे छत्रपती परिवाराची सदिच्छा भेट घेऊन स्नेहभोजन केले. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.शनिवारी (दि. २५) ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी न्यू पॅलेसला भेट देऊन छत्रपती परिवारासोबत भोजन केले होते. त्यातच रविवारी मुख्यमंत्र्यांनीही या ठिकाणी भेट दिली. त्यामुळे या भेटीला वेगळे महत्त्व आले होेते; परंतु यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, महाराणी याज्ञसेनी, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे यांनी स्वागत केले.यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती परिवारासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, आ. चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रा. संजय मंडलिक, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, महेश जाधव, विजय जाधव, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, व्ही. बी. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. शाहूजयंतीदिनी छत्रपती परिवाराकडून झालेल्या या सत्काराने मुख्यमंत्री भारावून गेल्याचे दिसले. (प्रतिनिधी)