शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सूत्रधार वीरेंद्रसिंग तावडेच

By admin | Updated: June 14, 2016 00:47 IST

सीबीआयचा दावा : एक महिना वॉच ठेवल्यानंतरच अटक; तपास अधिकाऱ्याची माहिती

पुणे/मुंबई/कोल्हापूर : सीबीआयने संशयावरून अटक केलेला ‘सनातन’चा डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हाच डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून तसे पुरावे सीबीआय गोळा करीत असल्याची माहिती तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी सोमवारी दिली. सीबीआयने सोमवारी सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमातून हार्ड डिस्क जप्त केली असून, त्यातून आणखी काही धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. तावडेला अटक करण्यापूर्वी एक महिन्यापासून त्याच्यावर ‘वॉच’ ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर १ जूनला त्याच्या पनवेल येथील घरामध्ये झडती घेतल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याच्याबाबत संशय बळावल्यामुळे १० तारखेला अटक करण्यात आल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग अकोलकर याच्यासोबत तावडेचा ई-मेलद्वारे संपर्क असल्याचे तपासात पुढे आले आहे. तीन ते चार ई-मेल्समध्ये संशयास्पद मजकूर होता. तावडेच्या पनवेलमधील घरामध्ये झडती घेतल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमधूनही काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. २००४ मध्ये कोल्हापुरात झालेल्या दाभोलकरांच्या कार्यक्रमात तावडेने त्यांच्याशी जाहीर वाद घातला होता. त्याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये अकोलकरचा नेमका ‘रोल’ काय आहे, याबाबतही तपास करण्यात येत आहे. तावडे हा पत्नी निधीसह आठ वर्षे साताऱ्यात राहात होता. त्याचा प्रेमविवाह झालेला असून तेथे तो वैद्यकीय व्यवसाय करीत होता, तर पत्नी एका रुग्णालयात नोकरी करीत असताना तिची दाभोलकरांचे बंधू देवदत्त दाभोलकर यांची सून डॉ. चित्रा प्रसन्न दाभोलकर यांच्याशी ओळख झाली होती. काही काळाने तावडे कुटुंबासह पनवेलला राहण्यास गेला. तिन्ही हत्यांचा सूत्रधार एकच?दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये एकसारखीच पद्धत वापरण्यात आली असल्यामुळे या तिन्ही घटनांमागे एकच मेंदू काम करीत असून हा तिन्ही घटनांच्या कटाचा सूत्रधार तावडे असावा, असा संशय सीबीआयला आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ टेस्ट?तावडे त्याच्या होत असलेल्या चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्यामुळे, तसेच तो प्रश्नांना अपुरी उत्तरे देत असल्यामुळे सीबीआयचे अधिकारी तावडेची ब्रेन मॅपिंग आणि पॉलिग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्याच्या विचारात आहेत.शस्त्रांच्या कारखान्याचा विचार?अकोलकर आणि तावडेमध्ये २०० पेक्षा अधिक ई-मेल्सद्वारे संपर्क झाला आहे. या दोघांनी मध्य प्रदेशामधून बेकायदा शस्त्र खरेदीसंदर्भात अनेकदा चर्चा केली असून गावठी कट्टे, विदेशी अग्निशस्त्र विकत घेण्याबाबत विचारविनिमयही केल्याचे समोर आले. शस्त्र निर्मितीसाठी छोटासा कारखाना टाकण्यासंदर्भात त्यांचे नियोजन होते का, याचा तपास सुरू असल्याचे एस. आर. सिंग म्हणाले. पोलिस महासंचालकांकडून आढावाराज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सोमवारी पुणे येथे तपास यंत्रणांच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दाभोलकरांसह तीनही हत्यांच्या तपासाचा आढावा घेतला. ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’च्या काही प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची हैदराबाद येथेही बैठक झाली. हे अधिकारी एका कार्यशाळेनिमित्त याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून एकत्र आहेत. ‘टीम तावडे’चे लक्ष्य केवळ डॉ. नरेंद्र दाभोलकरच नव्हते, तर महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांना ते संपविणार होते. हिंदू राष्ट्र स्थापण्यासाठी १५ हजारजणांचे लष्कर उभारण्याचीही त्यांची योजना होती.दाभोलकर हत्या प्रकरणातील दोन हल्लेखोरांपैकी पुणे येथील सारंग अकोलकर हा एक असून अकोलकरने गोळी झाडली. दुसरा हल्लेखोर म्हणजे मडगाव स्फोट प्रकरणातील सहआरोपी असल्याची माहितीही तपासातून पुढे येत आहे.