शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतीयांची छठपूजा यंदा घरीच; प्रशासनाने नदीघाटावर परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 10:53 IST

coronavirus, collcator, kolhapurnews, Religious programme कोरोनामुळे यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव तसेच नदीघाटावरील छठपूजेची परवानगी गुरुवारी रद्द केली आहे. प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार एका दिवसात सार्वजनिक ठिकाणावरील पूजेची सगळी व्यवस्था होणार नाही; त्यामुळे सर्व भाविकांनी आपल्या घरीच स्वत: व्यवस्था करून पूजा करावी, असे आवाहन राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाचे कार्यकारी अध्यक्ष ओमनारायण मिश्रा यांनी केले आहे.

ठळक मुद्देउत्तर भारतीयांची छठपूजा यंदा घरीचप्रशासनाने नदीघाटावर परवानगी नाकारली

कोल्हापूर : कोरोनामुळे यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव तसेच नदीघाटावरील छठपूजेची परवानगी गुरुवारी रद्द केली आहे. प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार एका दिवसात सार्वजनिक ठिकाणावरील पूजेची सगळी व्यवस्था होणार नाही; त्यामुळे सर्व भाविकांनी आपल्या घरीच स्वत: व्यवस्था करून पूजा करावी, असे आवाहन राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाचे कार्यकारी अध्यक्ष ओमनारायण मिश्रा यांनी केले आहे.उत्तर भारतीयांचा छठपूजा हा धार्मिक कार्यक्रम आज, शुक्रवारी कोल्हापूर व इचलकरंजी येथील पंचगंगा नदीघाट व तलावाच्या ठिकाणी करण्यात येणार होता. त्यासाठी सुुरुवातीला जिल्हा प्रशासनाने ५० माणसांना अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली होती; परंतु, दिवाळी उत्सव व हिवाळा लक्षात घेता या आजाराच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.

तसेच नदीकाठावर तलावाकाठी छठपूजेदरम्यान दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता, या ठिकाणी कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: सामाजिक अंतर राखणे शक्य होणार नाही, या कारणास्तव सूर्यषष्ठी व्रत व छठपूजेची परवानगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रद्द केली व तसे निर्देश महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना गुरुवारी दिले.सार्वजनिक ठिकाणी पूजा करायची असेल तर संस्थेने कृत्रिम तलाव उभारावा, नंतर तो बुजवावा, भाविकांची आरोग्य तपासणी करावी, एकमेकांच्या वस्तूंची देवाणघेवाण करू नये, सॅनिटायझर्स ठेवण्यात यावेत. हे ठिकाण निर्जंतुकीकरण करण्यात यावे अशा अटी घालण्यात आल्या आहेत. ही सगळी व्यवस्था एका दिवसात करणे शक्य नसल्याने संघाने सर्व भाविकांना घरीच राहून ही पूजा करण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर