शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok sabha 2024: ‘हातकणंगले’तून नकार, ‘कोल्हापुरा’तून रिंगणात उतरणार - चेतन नरके 

By भीमगोंड देसाई | Updated: March 28, 2024 14:28 IST

तीन-चार पक्षांनी दिला आहे प्रस्ताव, विजयासाठी लढणार

कोल्हापूर : हातकणंगले मतदार संघातून निवडणूक लढण्यास नकार देत ‘कोल्हापूर’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी आज, गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. यामुळे कोल्हापुरात आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या तीन वर्षापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. माझा संपर्क आणि कामाच्या आवाक्यामुळे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढण्याची ऑफर दिली होती. मात्र कमी दिवसांत मतदारसंघातील सर्व गावांत पोहचणे शक्य नसल्याने मी हातकणंगलेतून लढण्यास नम्रपणे नकार दिला आहे. पण ‘कोल्हापूर’ मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. तीन ते चार पक्ष माझ्या संपर्कात आहे. कोणत्या पक्षाकडून लढणार हे मी लवकरच जाहीर करेन, अशी माहिती ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी दिली.ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकीत हातकणंगलेतून माझे नावे पुढे आले होते. पण मी या मतदारसंघातून लढण्यास नकार दिला आहे. कोल्हापुरातून तयारी केली आहे. या मतदारसंघातून जिंकण्यासाठी लढणार आहे. कोल्हापूरसाठी मी संपर्क मोहीम गतीमान केली आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतून दुसरे नाव पुढे आले तरी मी अजून निवडणूक रिंगणातून एक्झिट घेेतलेलो नाही. मी रिंगणार राहणार आहे. पक्ष, गट कोणता हे मी आगामी काळात जाहीर करेन. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी, विकासाला प्राधान्य देते. माझ्याकडे विकास करण्याची क्षमता आहे. यामुळे मतदार तिसरा पर्याय म्हणून माझा निश्चित विचार करतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण