शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त सांडपाणी थेट गटारीत

By admin | Updated: February 2, 2015 00:10 IST

इचलकरंजीतील प्रकार : पंचगंगा प्रदूषण प्रश्न पुन्हा चर्चेत

इचलकरंजी : येथील आदर्श मंगल कार्यालयासमोर असलेल्या गटारीमधून गेल्या सहा दिवसांपासून प्रोसेसिंग हाऊसचे रसायनयुक्त सांडपाणी बाहेर पडत आहे. आज, रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणात गटारीतून पाणी रस्त्यावर बाहेर पडत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबरोबरच पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केले आहे. इचलकरंजीतील प्रोसेसर्स हाऊसचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यासाठी क्लस्टर योजनेच्या माध्यमातून सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे. असे असताना काही प्रोसेसर्सधारक सीईटीपीला जोडणी करूनही काही प्रमाणात रसायनयुक्त सांडपाणी गटारीत सोडतात. त्यामुळे विनाप्रक्रिया हे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. येथील आदर्श मंगल कार्यालयासमोर असलेल्या गटारीच्या झाकणामधून आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचे रसायनयुक्त सांडपाणी बाहेर येऊ लागले. या परिसरातील एका नागरिकाचा पाय पाण्यात गेल्याने त्याला किरकोळ इजाही झाली. त्यामुळे नगरसेवक प्रमोद पाटील व मदन झोरे यांनी त्याठिकाणी जाऊन सीईटीपी व प्रोसेसर्सधारकांना बोलावून घेतले. परिसरातील ३० ते ४० प्रोसेसर्सधारक त्याठिकाणी आले होते. हे पाणी नेमक्या कोणत्या प्रोसेसर्समधून बाहेर पडत आहे, हे पाहण्यासाठी गत दोन दिवसांपासून आम्ही आमचे प्रोसेसर्स हाऊस बंद ठेवले आहेत. तरीही पाणी येतच आहे. आम्ही आमचे सांडपाणी सीईटीपीला प्रकल्पाला जोडले असून, त्यासाठी येणारा खर्चही नियमित सीईटीपीकडे भरत आहोत. त्यामुळे गटारीत पाणी सोडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका प्रोसेसर्सधारकांनी घेतली. तसेच सीईटीपीने उपलब्ध करून दिलेल्या पाईपलाईन कमी रुंदीच्या असल्याने त्यामधून ओव्हर प्लो होऊन हे पाणी बाहेर पडत असेल, असेही काहींनी सांगितले. त्यावर सीईटीपी प्रशासनाने आणखीन एक पंप बसवून हे पाणी ओढून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून हे पाणी विनाप्रक्रिया थेट गटारीतून जात आहे. त्याचबरोबर शहरातील अन्य कोणकोणत्या भागात अशा प्रकारे सीईटीपीच्या भोंगळ कारभारामुळे पाणी गटारीतून थेट पंचगंगा नदीत जाते, हेही तपासून पाहण्याची गरज असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. (प्रतिनिधी)