शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

केमिकल झोन कोकणात नाहीच

By admin | Updated: October 2, 2015 23:19 IST

विनायक राऊत : मुख्यमंत्री ओघात बोलले

सावंतवाडी : कोकणात केमिकल झोन होणार नाही. नागपूरमध्ये उद्योजकांच्या बैठकीत भाषणाच्या ओघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले असून, त्यांनी याबाबतचा आमच्याकडे खुलासा केला आहे. त्यामुळे केमिकल झोनचा विषय संपला आहे, असे मत खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी मांडले. ते शुक्रवारी सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकार वेळागर येथे होणाऱ्या पंचतारांकित हॉटेलबाबत ताज समूहाशी आठ दिवसांत करार करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शहरप्रमुख शब्बीर मणियार आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानभरपाई देत असताना एका सात-बारावर मोठ्या प्रमाणात नावे असल्याने कोणाला नुकसानभरपाई द्यावी, असा प्रश्न येतो. पण आता हा प्रश्न निकाली निघाला असून, पूर्वीप्रमाणे हमीपत्राद्वारे ही नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत गुरुवारी मंत्रालयात पालकमंत्री दीपक केसरकर तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व आपल्या उपस्थितीत बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सीआरझेडबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘पंचतारांकित’चा करार आठवड्यात शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी ताज गु्रपने बरीच वर्षे झाली जागा घेतली. याचे भाडे नाममात्र दराने सरकारकडे भरले जाते. पण अद्यापपर्यंत या ठिकाणी हॉटेल उभारणी करण्यात आली नाही. ही बाब बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या आठ दिवसांत या प्रकल्पाबाबत ताज गु्रपशी चर्चा करून करार करण्यात येणार आहे. त्यामुळे बरीच वर्षे प्रलंबित असणारे प्रश्न निकाली लागणार आहेत. मुख्यमंत्री सिंधुदुर्गमधील पर्यटनवाढीसाठी उत्सुक असून, आणखी काही खासगी गुंतवणूक कोकणात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.