शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार विद्यार्थ्यांची कल तपासणी

By admin | Updated: January 11, 2016 01:09 IST

पुढील महिन्यात चाचणी : आॅनलाईन नोंदणी न केलेल्या २१ शाळांना नोटीस; दुकानदारीला चाप

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -जिल्ह्यातील सर्व माध्यमांतील दहावीच्या ६० हजार ६९० विद्यार्थ्यांची कल चाचणी ५ ते १५ फेब्रुवारीअखेर घेण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभाग व कोल्हापूर विभागीय माध्यमिक, उच्च माध्यमिक मंडळ (एसएससी)च्या प्रशासनाने केले आहे. कल चाचणीसाठी आॅनलाईन नोंदणी न केलेल्या २१ शाळांना माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी नोटीस दिली आहे. शाळांमध्येच मोफत कल चाचणी होणार असल्यामुळे खासगी दुकानदारीला चाप बसणार आहे.कोणत्या क्षेत्रात आवड आहे, हे तपासून अभ्यासक्रमांची निवड केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे करिअर चांगले होते. दहावीनंतर अभ्यासक्रमाची निवड केली जाते. त्यामुळे दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पालक आपल्या पाल्याची कल चाचणी करून घेतात. त्या चाचणीत कल अधिक असलेल्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. अलीकडे कल चाचणी करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होते आहे. परिणामी खासगी काही संस्था आणि व्यक्ती कल चाचणी घेऊन निकाल देतात. त्यासाठी कमीत कमी दोन ते पाच हजारांपर्यंत फी घेतात.दरम्यान, शासनाच्या शिक्षण विभागाने यंदा शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्यांची मोफत कल चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यातील मंडळांना आणि माध्यमिक शिक्षण विभागास सूचना दिल्या आहेत. कल चाचणीचा निकाल दहावीच्या गुणपत्रिकेबरोबरच दिला जाणार आहे. जो विद्यार्थी कल चाचणी देणार नाही, त्याची दहावीची गुणपत्रिका विभागीय मंडळाकडून दिली जाणार नाही. त्यामुळे प्र्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यास कल चाचणी देणे बंधनकारक आहे. मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागातर्फे प्रत्येक शाळांमध्ये कल चाचणी घेण्याचे नियोजन केले आहे. शिक्षण विभाग आणि मंडळाच्या प्रशासनाने वेळोवेळी पत्रव्यवहार करून जिल्ह्यातील ९५३ माध्यमिक शाळांना कल चाचणीसंबंधी माहिती दिली आहे. आॅनलाईन नोंदणीसाठी आवाहन केले आहे. मंडळाकडे कल चाचणी नोंदणीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१५ अखेर होती. त्यामध्ये अद्याप २१ शाळांनी नोंदणी केलेली नाही. त्या शाळांना कल चाचणीसाठी नोंदणी करा, अन्यथा शाळेचा परीक्षेचा ‘सांकेतिक क्रमांक’ गोठविण्यात येईल, अशी नोटीस दिली आहे. नोंदणीसाठी शेवटची संधी दिली आहे. नोंदणी न केल्यास संबंधित शाळांवर कारवाई होणार आहे. कारवाई झाल्यास त्या शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता येणार नाही. इतके गंभीर असतानाही २१ शाळांनी मुदतीत नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामध्ये बहुतांशी खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. तालुकानिहाय कल चाचणी देणारे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी, कंसात विद्यार्थिनींची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा - १००१ (८६५), भुदरगड - १४२३ (१२३८), चंदगड - १७६४ (१५११), गडहिंग्लज - २२६३ (१९६६), गगनबावडा - ३४२ (२५०), हातकणंगले - ५७३७ (५०१७), कागल - २६५३ (२०१७), करवीर - ३७९४ (२७२७), कोल्हापूर शहर - ५०४१ (३९९०), पन्हाळा - २७६४ (१८२६), राधानगरी - १७४५ (१४९४), शाहूवाडी - १५७५ (११९०), शिरोळ - ३०७५ (२४२२). शासनाच्या आदेशानुसार सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी शाळास्तरावर घेण्याचे नियोजन केले आहे. कल चाचणीसाठी आॅनलाईन नोंदणी न केलेल्या २१ शाळांना नोटीस दिली आहे. त्वरित नोंदणी न केल्यास कारवाई केली जाईल. पुढील महिन्यात संबंधित शाळांत कलचाचणी घेतली जाईल.- ज्योत्स्ना शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी