शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सुमोंनाही कोल्हापूरच्या लाल मातीचे आकर्षण--जपानी पथकाकडून लघुपट निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापुरी लाल मातीतील कुस्तीचे अप्रूप भारतीयांसह परदेशी नागरिकांनाही आजही आहे. जपानच्या सुमो पैलवानांनाही या कुस्तीबद्दल मोठी उत्सुकता आहे. या कुस्तीतील बारकावे त्यांना उपयोगात यावेत यासाठी गेले दोन दिवस खास कोल्हापुरी कुस्तीचा अभ्यास करणारे जपानमधील आठजण केवळ लाल मातीतील कुस्तीवर लघुपट बनवत आहेत. त्याचे चित्रीकरण कोल्हापुरातील विविध ...

ठळक मुद्देपैलवान व कुस्तीचे बारकावे टिपत विविध तालमीत चित्रीकरणमल्लांची पहाटे चार वाजल्यापासून ते अगदी ते रात्री झोपेपर्यंतची दिनचर्या त्यांनी कॅमेºयात टिपलीलाभ जपानमधील कुस्तिगीरांना व सुमो पैलवानांना व्हावा याकरिता आॅस्ट्रेलियन दिग्दर्शक डॅनियल यांच्या मार्गदर्शनाखाली जपानमधील आठजणांनी लघुपट बनविण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापुरी लाल मातीतील कुस्तीचे अप्रूप भारतीयांसह परदेशी नागरिकांनाही आजही आहे. जपानच्या सुमो पैलवानांनाही या कुस्तीबद्दल मोठी उत्सुकता आहे. या कुस्तीतील बारकावे त्यांना उपयोगात यावेत यासाठी गेले दोन दिवस खास कोल्हापुरी कुस्तीचा अभ्यास करणारे जपानमधील आठजण केवळ लाल मातीतील कुस्तीवर लघुपट बनवत आहेत. त्याचे चित्रीकरण कोल्हापुरातील विविध तालमींमध्ये सोमवारी झाले.

लाल मातीतील कुस्ती आखाडे दिल्लीसह कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात आहेत. यासह दिग्गज मल्लांची परंपरा लाभलेल्या या कोल्हापुरात लाल मातीत सराव करणारा मल्ल व त्याची दिनचर्या काय असते. त्याचा लाभ जपानमधील कुस्तिगीरांना व सुमो पैलवानांना व्हावा याकरिता आॅस्ट्रेलियन दिग्दर्शक डॅनियल यांच्या मार्गदर्शनाखाली जपानमधील आठजणांनी लघुपट बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून या परदेशी पाहुण्यांनी कोल्हापुरात मुक्काम ठोकला होता. त्यात रविवारी प्रथम त्यांनी महान भारत केसरी दादू चौगुले यांची मुलाखत घेतली. त्यानंतर मोतीबाग तालीम येथील मल्लांची पहाटे चार वाजल्यापासून ते अगदी ते रात्री झोपेपर्यंतची दिनचर्या त्यांनी कॅमेºयात टिपली.

यासह सोमवारी पहाटे चार वाजता या परदेशी पाहुण्यांनी गंगावेश येथील शाहू विजयी गंगावेश तालमीमधील मल्लांचीही दिनचर्या टिपली. त्यात ते राहतात कसे, जेवतात काय, खुराक काय, मालिश करण्याची पद्धत आदींची माहिती घेत त्यांचे चित्रीकरण केले. या परदेशी पाहुण्यांची कोल्हापुरातील सर्व व्यवस्था चित्रपटनिर्मिती व्यवस्थापक मिलिंद अष्टेकर यांनी केली होती. 

जपानी लोकांना भारतीय कुस्तीबद्दल उत्सुकता आहे. त्यात कोल्हापुरातील तालमींबद्दल जादा विशेष आकर्षण आहे. यातील बारकावे माहिती करण्याबाबत त्यांना आकर्षण आहे. त्यामुळे माझ्या दिग्दर्शनाखाली जपानमधील तीन कॅमेरामनसह आठजणांचे पथक दिल्ली, कोल्हापुरात चित्रीकरण केले. सुमो पैलवानांना लाल मातीतील कुस्तीतील बारकाव्यांचा निश्चितच लाभ होईल.- डॅनियल, आॅस्ट्रेलियन दिग्दर्शक