शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
2
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
3
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
4
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
5
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
6
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
7
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
8
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
9
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
10
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
11
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
12
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
13
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
14
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
15
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
16
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
17
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
18
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
19
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
20
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला

डॉल्बीप्रकरणी २१३ जणांवर आरोपपत्र

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

३७ मंडळांचे कार्यकर्ते : फिरंगाई, तटाकडील, पाटाकडील, वेताळ माळ तालमींचा समावेश

कोल्हापूर : गणेशोत्सव काळात पोलिसांचे आदेश धुडकावून डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या शहरातील ३७ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून मंडळांच्या उत्सव समितीच्या अध्यक्षासह पदाधिकारी अशा २१३ कार्यकर्त्यांविरोधात शनिवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यामध्ये प्रत्येक आरोपीला पाच वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंड व शिक्षा होऊ शकते, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांची बैठक घेऊन, नियम डावलून डॉल्बी लावणाऱ्या तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलिस प्रशासनाने केली होती. तसेच प्रत्येक मंडळाला तशी लेखी नोटीसही बजाविली होती. निवासी परिसरात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा मंडळांना घालून दिली होती. तसेच डॉल्बी लावल्याने मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचे जाहिरातींच्या माध्यमातून प्रबोधनही केले होते. परंतु, काही मंडळांनी डॉल्बीमुक्त उत्सवाचे पोलिसांचे आदेश धुडकावून गणेशोत्सवाची परंपरा मोडीत काढत डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण केल्याने मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई चौक, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश ते पंचगंगा घाट या मार्गांवर मिरवणूक रेंगाळल्यामुळे रहदारीस अडथळा झाला. पोलिसांनी संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण केले. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही ध्वनिक्षेपक मापन यंत्राद्वारे डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा तपासली. त्याचा अहवाल त्यांनी पोलिसांना दिला. त्यानुसार पोलिसांनी शहरातील ३७ सार्वजनिक मंडळांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. दरम्यान, संबंधित मंडळांवर कठोर कारवाईसाठी विसर्जन मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण, वृत्तपत्रांतील बातम्या, छायाचित्रे यांचा आधार घेत, तसेच सरकारी पंचांची साक्ष घेऊन गुन्ह्णांचे दोषारोपपत्र शनिवारी न्यायालयात सादर केले. या कारवाईमध्ये डॉल्बीचा वापर करणारे डॉल्बीचालक, मालक, उत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व ज्या वाहनांवर डॉल्बी यंत्रणा ठेवण्यात आली आहे, त्या वाहनांचे चालक, मालक, आदींना झटका बसणार आहे. त्यामध्ये प्रत्येकास पाच वर्षे कारावासाची शिक्षा व एक लाख रुपये दंड होण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मंडळांची नावे अशी... तटाकडील तालीम मंडळ, वेताळ माळ तालीम मंडळ, फिरंगाई तालीम मंडळ, बी. जी. एम. मंडळ (शिवाजी पेठ), हिंदवी स्पोर्टस, आझाद हिंद तरुण मंडळ, दयावान ग्रुप (ताराबाई रोड), रंकाळावेश तालीम मंडळ, क्रांती बॉईज, कै. उमेश कांदेकर युवा मंच (रंकाळा टॉवर परिसर), पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब (मंगळवार पेठ), मोहिते स्पोर्टस प्रणित स्वामी समर्थ चॅरिटेबल मंडळ (कळंबा), आयडियल ग्रुप (संभाजीनगर), अवचित पीर तरुण मंडळ (खरी कॉर्नर), बालगोपाल तालीम मंडळ (खासबाग मैदान), लक्ष्मी गल्ली तरुण मंडळ, बजापराव माजगावकर तरुण मंडळ (पापाची तिकटी), म्हसोबा तरुण मंंडळ (म्हाडा कॉलनी, गजानन महाराजनगर), शाहू उद्यान तरुण मंडळ (गंगावेश), वाघाची तालीम मंडळ (उत्तरेश्वर पेठ), कट्टा ग्रुप (लक्ष्मीपुरी), साईबाबा ग्रुप (रविवार पेठ), पिंटू मिसाळ बॉईज (लक्षतीर्थ वसाहत), चक्रव्यूह तरुण मंडळ (जुने साळोखे पार्क), स्वयंभू तरुण मंडळ (आर. के.नगर), बालगोपाल तरुण मंडळ (सुभाषनगर), बागल चौक मित्रमंडळ (शाहूपुरी), स्पायडर ग्रुप, बी. एम. एम. बालावधूत मित्रमंडळ (उद्यमनगर), क्रांतिसिंह तरुण मंडळ (स्वातंत्र्यसैनिक वसाहत), आझाद तालीम (विक्रमनगर), साईनाथ मित्रमंडळ (सुभाषनगर), शिवप्रेमी मित्रमंडळ (शांतीनगर), सह्णाद्री गणेश मित्रमंडळ (सुभाष रोड), विश्वशांती तरुण मंडळ (रविवार पेठ), न्यू मित्रप्रेम फ्रेंड्स सर्कल (यादवनगर), सदर बझार तरुण मंडळ (गवळी गल्ली, सदर बझार).