शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

आरोपांच्या फैरी झडू लागल्या

By admin | Updated: July 17, 2015 23:02 IST

शिरोळ तालुका : ९४१ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती

संदीप बावचे- शिरोळ  तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर आघाड्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यात ७४ जागा बिनविरोध झाल्या असून, आता ३२ ग्रामपंचायतींसाठी लढत होणार आहे. एकूण ग्रामपंचायत सदस्यांच्या ३५१ जागांसाठी ९४१ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य आता मतदारांच्या हाती आहे. दरम्यान, बुहतांशी ठिकाणी सत्ताधारी व विरोधी गटाकडून प्रचाराचा नारळ फुटला असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्याने गावातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी बुबनाळ ग्रामस्थांनी इतिहास घडविताना संपूर्ण अकरा जागांवरती महिलांना बिनविरोध निवडून आणून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे, तर कोथळी, शिरढोण, शेडशाळ, जुने दानवाड व मजरेवाडी येथे बहुतांशी जागा बिनविरोध झाल्या. मात्र, संपूर्ण जागा बिनविरोध करण्यात नेत्यांना अपयश आले. काही गावांत निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. जेथे बिनविरोध निवडणुका झाल्या त्याठिकाणी अर्ज माघारीसाठी गट नेत्यांना विनवणी करावी लागली. गावातील इतर संस्थांवर संधी देण्याचे आश्वासन देण्याबरोबरच काही उमेदवारांनी यासाठी आर्थिक उलाढालही घडवून आणली. तालुक्यात ३२ ग्रामपंचायतींच्या ३५१ जागांसाठी ९४१ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. तालुक्यात राजकीय गट-तट मोठ्या संख्येने असला, तरी काही गटांनी व उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार तडजोडी घडवून आणल्या. काही गावांत सत्तेसाठी जातीचाही आधार घेतला जात आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर विजयासाठी सत्ताधारी व विरोधी गटांकडून हालचालींना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत. विविध आघाड्यांकडून प्रचाराचा नारळ फोडला जात असून, एकमेकांची उणीदुणी काढण्यात धन्यता मानली जात आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने गावातील राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. एकेका मतासाठी आतापासूनच व्यूहरचना आखली जात असून, नातीगोती आणि पै-पाहुण्यांचाही आवश्यकतेनुसार उपयोग करून घेतला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या यशावरच विविध पक्षांच्या नेत्यांची ताकद समजणार असल्याने सर्वच नेतेमंडळींकडून आपआपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना केली जात आहे. विधानसभेचे पडसाद उमटणारविधानसभा निवडणुकीतील पडसाद काही गावांत हमखास उमटणार आहेत. गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर तालुक्यात जातीय समीकरणाने पुन्हा जोर धरला आहे. पक्षापेक्षा गटा-तटांच्या निवडणुका होत असल्या, तरी विधानसभा निवडणुकीत पेरलेले राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीत उगवणार, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.