शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.चा भार ‘प्रभारीं’वर : कोल्हापूर विभागातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:54 IST

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाºयांवर सुरू आहे

ठळक मुद्देकामकाज चाललेय ढकल स्टार्टने, कामाचा बोजवाराप्रमुख तीन पदांसह वीसहून अधिक विविध पदे रिक्तकर्मचाºयांचे अनेक प्रश्न प्रलंबितअतिरिक्त कामांमुळे अधिकारी मेटाकुटीला प्रवाशांची गैरसोय

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाºयांवर सुरू आहे. विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय वाहतूक अधीक्षक या प्रमुख तीन पदांसह विभागातील वीसहून अधिक अधिकाºयांची विविध पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती व बदलीमुळे या रिक्त जागांचा कार्यभार सध्या प्रभारी अधिकाºयांवर सोपविला आहे. अतिरिक्त कारभारामुळे कोल्हापूर विभागाचे सध्याचे कामकाज ‘ढकल स्टार्ट’ गाडी सारखेच सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन असर ‘एस. टी.’चा नावलौकिक आहे. मात्र, अंतर्गत अडचणींमुळे एस. टी. तोट्यात चालली आहे. त्यामध्येच पुरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्याने राज्यभरातील विभागात कामांचा बोजवारा उडताना दिसत आहे. हीच परिस्थिती कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळत आहे.

कोल्हापूर विभागातील विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी आणि विभागीय वाहतूक अधीक्षक ही तिन्ही प्रमुख पदे रिक्त आहेत. त्यांचा परिणाम येथील दैनंदिन कामकाजावर होत आहे. विभाग नियंत्रक नवनीत भानप दि. ३१ आॅक्टोबरला सेवानिवृत्त झाले. मात्र, सेवानिवृत्तीपूर्वी ते चार महिने रजेवरच असल्याने प्रमुख निर्णय गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित आहेत.

विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. आगारातील वाहतुकीसंदर्भातील, प्रवाशांची जादा गाडीची मागणी, अपघात झालेल्या चालकांची सर्व प्रकरणे त्यामुळे प्रलंबित आहेत. विभागीय वाहतूक अधीक्षक पद गेले सहा महिने रिक्त आहे. त्यामुळे वाहकांची अपराध प्रकरणे प्रलंबित आहेत. तिन्ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कोल्हापूर विभागाची स्थिती कप्तान नसलेल्या जहाजासारखी झाली आहे. कोल्हापूर विभागातील प्रभारी कारभार संपुष्टात आणून कायमस्वरूपी अधिकारी नेमून प्रवासी व कर्मचाºयांची गैरसोय टाळावी, अशी मागणी एस. टी. संघटना व प्रवाशांतून होत आहे.कोल्हापूर विभागातील आगारनिहाय रिक्त पदेकोल्हापूर आगार : सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक एक दीर्घ रजेवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक चार मंजुरीपैकी एकही नियुक्त नाही.संभाजीनगर आगार : आगार व्यवस्थापक नाही.गडहिंग्लज आगार : आगार व्यवस्थापक रजेवर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाहीत.गारगोटी आगार : सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक दोनपैकी एक नियुक्त, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नियुक्त नाहीमलकापूर आगार : आगार व्यवस्थापक नाही, वाहतूक निरीक्षक दोनपैकी एक नियुक्तचंदगड आगार : आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक नाहीतकुरुंदवाड आगार : सहाय्यक वाहतूक अधीक्षक, दोन वाहतूक निरीक्षक नाहीत.कागल आगार : सहाय्यक वाहतूक अधीक्षक नाही. +